Breaking News

1/breakingnews/recent

20 जानेवारी Good Morning सह्याद्री

No comments

    News24सह्याद्री - मराठा आरक्षणावर आज सुनावणी....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES


1. यंदा राजपथावर महाराष्ट्राचं वैभव देश पाहणार 
यंदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी राजपथावर महाराष्ट्रातल्या संत परंपरेवर आधारित चित्ररथ असणार आहे. राजपथावर यावेळी दिसणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाची पहिली झलक समोर आली असून सध्या या चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात आहे.  

2. कृषी कायद्यांविरोधात २५ जानेवारीला आझाद मैदानात आंदोलन
 राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 25 जानेवारी रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर शेतकरी आंदोलनास पाठिंबा देणाऱ्या निदर्शनात सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्यमंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली आहे

3. मुख्यमंत्र्यांच्या मुंबई महापालिकेला सूचना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या सौंदर्यीकरणाच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी हे निर्देश मुंबई महापालिकेला दिले आहेत 

4. मराठा आरक्षणावर आज सुनावणी
 मराठा आरक्षणावरील आजची सुनावणी 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे होणार आहे. मराठा आरक्षणाच्या  सुनावणीसाठी 25 जानेवारी ही तारीख आधी निश्चित करण्यात आली होती. मात्र २५ जानेवारीला यावर सुनावणी न होता ती आज होणार आहे. 

5. पिलीव घाटात सातारा-सोलापूर एसटीवर दगडफेक
 बसमध्ये एकही प्रवासी नसल्याने यात कोणी जखमी झाले नसले तरी बसमागून येणाऱ्या दुचाकीवरील दोघांना दगड लागून ते जखमी झाल्याचा प्रकार काल रात्री अकराच्या सुमारास घडला. सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत ही घटना घडली.  

6. डोंबिवलीत वॉल पेंटिंग्जच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती
 पेंटिंग्जमधून नागरिकांना जनजागृतीपर संदेश दिले जात असून यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंतींना एक वेगळा लूक सुद्धा येतो आहे. तर बच्चे कंपनीला आपल्या लाडक्या कार्टून्स चिंत्रासोबत सेल्फी सुद्धा काढता येणार आहे. नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून डोंबिवली पश्चिमेतून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

7. रस्ता सुरक्षा अभियानाचे सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन
उल्हासनगर शहरातील जनतेमध्ये वाहतुक नियमासंर्दभात जनजागृती निर्माण व्हावी.या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त दत्ता तोटेवाड व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

8. अकोल्यात बर्ड फ्लू बाबत जनजागृती कार्यक्रम
 चिकन प्रेमींना मार्गदर्शन करण्यात आलं सोबतच अंडी आणि चिकन तयार करून उपस्थितांना मेजवानीसाठी ठेवण्यात आली. तसेच बर्ड फ्ल्यू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत,अशी सर्व जनतेणे नोंद घ्यावी असेही आवाहन आयोजकांनी यावेळी केलय. 

9. जालन्यात ब्राह्मण समाजाचे विविध मागण्यांसाठी आंदोलन 
शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि सेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी ताम्हण पळी वाजवत या आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच या आंदोलनात अमित कुलकर्णी, गजेद्र देशमुख,अनंत वाघमारे राजेश जोशी यासह महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता.  

10. इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची घोषणा
 इंग्लंडच्या भारत दौऱ्याची आधीच घोषणा करण्यात आली होती. आता भारत आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या पहिल्या दोन कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. 5 फेब्रुवारीपासून उभय संघांमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *