पोलिसांनी वर्क फ्रॉम होम केलं असतं तर काय झालं असतं? - उद्धव ठाकरे
मुंबई -
कोरोनाच्या काळात आपले संरक्षण करणारे पोलीस फ्रंटलाइनवर लढले. जी काही परिस्थिती नियंत्रणात आहे व नियंत्रणात आणले ते पोलिसांमुळेच आहे असे म्हणत मुंबई पोलिसांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. एवढंच नाही तर कोरोनाच्या काळात आपण लॉकडाउन केले, निर्बंध लादले, वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला. पोलिसांनी वर्क फ्रॉम होम केले असते तर? क्षणभर विचार केला पोलिसांनी वर्क फ्रॉम होम केले असते तर काय झाल असत? पण तसे झाले नाही. पोलीस फ्रंटलाइनवर काम करत होते म्हणूनच कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली. कोरोनासोबतच्या लढ्यात अनेक पोलीस शहीद झाले. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी दुःखही व्यक्त केले.
पोलीस दलाची बदनामी करणाऱ्यांची तोंडे बंद झाली पोलिसांचे कर्तृत्व हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. त्यामुळे त्यांची बदनामी करणाऱ्यांची तोंडं बंद झाली असही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. पोलिसांचे कर्तृत्त्व सूर्यप्रकाशाइतक स्वच्छ आहे. त्यामुळे कुणी कितीही आदळआपट केली तरीही त्यावर डाग लावू शकणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तुम्ही दक्ष राहून काळजी घेता, जबाबदारी घेता त्यामुळे आम्ही आमचे सण साजरे करतो. त्यासाठी तुमचे धन्यवाद असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

No comments
Post a Comment