Breaking News

1/breakingnews/recent

त्यांच दुकान बंद होऊ नये म्हणून ते टीका करत असतात - अनिल देशमुख

No comments



मुंबई -

अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला ते म्हणाले की माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन राज्य सरकारवर टीका करत असतात. देवेंद्र फडणवीस हे चांगले काम केले तरी टीकाच करणार आहे.  त्यांचे दुकान बंद होऊ नये म्हणून ते टीका करत असतात असा टोला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लगावला आहे. अनिल देशमुख यांनी नववर्षाच्या निमित्ताने पुण्यातील येरवडा कारागृहाला भेट दिली. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

येरवडा कारागृहबाबत काही मागण्या होत्या. त्याबाबतचं निवेदन यावेळी अनिल देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आले. कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त संख्या असून आपल्याला मॉडर्न कारागृह करायचं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे कारागृहाची क्षमता वाढवण्यासाठी प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती यावेळी अनिल देशमुख यांनी दिली.

भिडे  एकबोटे यांच्यावर रितसर कारवाई होईल आणि चार्जशीटचा प्रस्ताव देखील मंजूर केला गेला आहे असेही यावेळी त्यांनी सांगितले. तसंच बी. जी. कोळसे पाटलांची सुरक्षा का काढली याचा आढावा घेत असल्याचे ते म्हणाले आहेत. याआधी सुबोध कुमार जैस्वाल यांच्यावरून तुम्हाला देवेंद्र फडणवीस हे लक्ष करीत आहे असं विचारलं असता ते म्हणाले होते की, देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेता आहेत. त्यामुळे जे काही आमच्या बद्दल बोलणार ते विरोधातच बोलणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे एवढं काही लक्ष देण्याची आवश्यकता नाही.असे अनिल देशमुख यांनी सांगितले 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *