कामावर उशिरा येणाऱ्या लेटलतिफांना चाप: सरकारकडून नवी नियमावली जाहीर
मुंबई -
सरकारी कार्यालये आणि त्यांच्या कामाची पद्धत यासाठी नागरिकांना त्याचा त्रास होतो खोळंबून बसावे लागते वेळेत कोणतेच काम होत नाही. आपल्या कडे एक म्हण प्रचलित आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब !' अगदी याच म्हणीला साजेस काम या सरकारी कर्मचार्यांकडून सुरु असल्याच अनेकदा अनुभवायला मिळत. यामध्ये कामामध्ये दिरंगाई, नागरिकांना अधिकारी कर्मचार्यांची वाट बघावी लागते. तर कर्मचार्यांच्या उशिरा येण्यामुळे देखील नागरिकांना तासनतास खोळंबून बसावे लागते. मात्र आता या सरकारी लेटलतिफांना चाप लावला जाणार आहे.वेळेत सगळे काही होणार आहे. या साठी राज्य सरकारने नवी नियमावली लागू केली आहे. यानुसार उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार कापण्यापासून ते त्यांच्या सुट्ट्या कापण्यापर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने हे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार एका महिन्यात तीनपेक्षा अधिक दिवस कामावर उशिराने पोहोचल्यास एक दिवसाची सुट्टी कापली जाईल.
तसेच महिन्यातून 9 पेक्षा अधिक वेळा कामावर उशिरा आल्यास कर्मचाऱ्याला महिन्याला मिळणाऱ्या सुट्ट्यांमध्ये कपात केली जाणार आहे. त्याच बरोबर ज्या अधिकाऱ्यांकडे महिन्यांच्या सुट्ट्या शिल्लक नाहीत आणि तरीही ते उशिरा कार्यालयात येत असतील तर त्या हिशोबाने त्यांचा पगार देखील कापला जाणार आहे. या शिवाय ज्या अधिकाऱ्यांना सुट्ट्या कापू नये असे वाटते ते अधिकारी जर दोनपेक्षा अधिक दिवस एक किंवा दीड तास उशिराने ऑफिसात आले तर त्यांना उशिरापर्यंत कार्यालयात काम करावं लागणार आहे. या निर्णयावरून आता भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कामावर उशिरा येणाऱ्या लेटलतिफांना चाप; सरकारकडून नवी नियमावली जाहीर आणि मंत्रालयात न जाणाऱ्या घरकोंबड्यांसाठी सरकारने काही नियमावली जाहीर केली आहे का? असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.

No comments
Post a Comment