Breaking News

1/breakingnews/recent

ऐतिहासिक वाड्याला जतन करण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध

No comments

 


मुंबई -

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी व सक्षमीकरणासाठी आपले आयुष्य वेचले, आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले त्यांच्या या महान कार्याची कृतज्ञता म्हणून राज्य सरकारने या वर्षी पासून त्यांची जयंती राज्यात महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यातील फुले वाड्याचा सर्वांगीण विकास करून या ऐतिहासिक वाड्याला जतन करण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध असल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ना. मुंडे यांनी पुण्यातील फुले वाडा येथे जाऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ना. मुंडे यांनी अधिकाऱ्यांसह संपूर्ण वाड्याची पाहणी केली, यावेळी राज्य सरकारच्या वतीने फुले वाड्यात ज्या - ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या पुरवून या ऐतिहासिक स्थळाचा पुनर्विकास केला जाईल असेही म्हटले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *