मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा: शिवसेनेच्या या भूमिकेवर काँग्रेसची प्रतिक्रिया
मुंबई -
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने गुजराती भाषिक नागरिकांना आकर्षित करण्यासाठी गुजराती भाषिकांचा मेळावा आयोजित केला आहे. शिवसेनेच्या या भूमिकेवर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे. येत्या 10 तारखेला जोगेश्वरीत हा मेळावा संपन्न होणार आहे. या मेळाव्यासाठी ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी टॅगलाईन वापरली जात आहे.काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली. शिवसेनेच्या भूमिकेवर मी काय सांगू शकतो. महाविकास आघाडी मजबूत व्हावी असं मला वाटते. कालांतराने भूमिका बदलतात.
अनुभवाने माणूस शिकतो. शिवसेनाचा हा बदल स्वागतार्ह आहे अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली. अशोक चव्हाण यांनी यावेळी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. औरंगाबाद शहराच्या नामकरणावरुन राजकारण तापले आहे. याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. औरंगाबाद नामकरण हा विषय माध्यमांनी उचललेला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही बोलले आहेत का? सरकारमधून कुणी काही निर्णय घेतले का? माध्यमांनी अजेंडा सेट करायचा त्यावर प्रतिक्रिया घ्यायच्या, अजूनही हा विषय नाही. आम्हाला राज्यातील विकास कामांबाबत जास्त रस आहे. जिल्हास्तरावर कुणी काही बोलत असतील तर तो विषय जिल्हास्तरावरचा आहे. राज्य स्तरावर हा विषय नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

No comments
Post a Comment