Breaking News

1/breakingnews/recent

5 जानेवारी Good Morning सह्याद्री

No comments

   News24सह्याद्री - खुपगावचा आदर्श इतर गावांनीही घेतला पाहिजे - रविकांत तुपकर...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट




TOP HEADLINES


1. आज दुपारी दोन वाजता सिंघु बॉर्डरवर शेतकरी नेत्यांची बैठक
8 जानेवारीला शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये बैठक होणार आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की, जोपर्यंत सरकार त्यांच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत ते आंदोलन सुरुच ठेवणार आहेत. अशातच आज शेतकरी संघटनांचे नेते बैठक घेणार आहेत.  

2. डोंबिवलीत सुरू झाली माणुसकीची भिंत
डोंबिवली पालिका मुख्यालयाच्या आवारातही ही माणूसकीची भिंत उपक्रमाची सुरुवात झाली असून डोंबिवलीकरांनीही गरजूंना मदतीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन प्रभागक्षेत्र अधिकारी राजेश सावंत व उपायुक्त रामदास कोकरे यांनी केले.

3. "मिस इंडिया" गजनंदीनी गिरासेचा शिवसेना महीला आघाडीकडून सत्कार
काल शिवसेना महीला आघाडी च्या कार्यकर्त्यांनी तिच्या घरी जावुन तिला पेढा भरवुन पुष्पगुच्छ देवुन तिचा सत्कार केला.

4. नऊ महिन्याच्या गॅपनंतर नाटक सुरु झाल्याने आम्हाला एनर्जी आणि उत्साह आला - भरत जाधव 
पुणे, पनवेल, कल्याण आणि डोंबिवली येथे नाटकाचे प्रयोग फुल्ल होत आहेत. आज सुद्धा डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले येथील प्रयोग हाऊस फुल्ल झाला आहे असे भरत जाधव यांनी डोंबिवलीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

5. खुपगावचा आदर्श इतर गावांनीही घेतला पाहिजे - रविकांत तुपकर
नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचे व गावकऱ्यांचे स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर येथे अभिनंदन केले. तसेच जिल्ह्यातील बाकी ग्रामपंचायतीनी खुपगाव गावाचा आदर्श घेतला पाहिजे,असे मत रविकांत तुपकरांनी याप्रसंगी व्यक्त केले 

6. शिक्षक सेनेकडून 'महिला शिक्षण दिना'निमित्त शिक्षिकांचा सन्मान
शिक्षक सेनेकडून भगवान हिवाळे व अनिल काळे यांच्या संकल्पनेतून शिक्षिकांना लिखाणाचे प्रतीक म्हणून एक डायरी व कालदर्शिका भेट म्हणून देण्यात आले. 

7. वळदगाव ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध
ग्रामपंचायतीची निवडणुक रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र हि निवडणूक बिनविरोध पार पडली. बिनविरोध निवड झाल्यनानंतर नवनिर्वाचित पदाधिकाºयांनी गावातील मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ग्रामस्थांने त्यांचे स्वागत करुन फटाक्याची आतिषबाजी केली. 

8. ब्राह्मण समाजाने मार्च अखेर कुठेही मोर्चा काढू नये - सुरेश मुळे 
मार्चपर्यंत कार्यवाही झाली तर ठीक नाहीतर एप्रिल आणि मे मध्ये ब्राम्हण समाजाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर कोणीही आंदोलन करू नये असे आवाहन ब्रम्ह महाशिखरचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांनी केले आहे. 

9. मुख्य रस्त्याच्या कामांकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
बांधकाम विभागाने त्या खड्ड्यात खडी आनुन टाकली मात्र रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले नाही . रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बांधकाम खात्याने सदरील रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे. 

10. राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हाध्यक्षपदी प्रविण चोपडे यांच्या नियुक्तीची घोषणा
 राष्ट्रीय चर्मकार महासंघ ही संघटना सर्वात मोठी संघटना असून ही अराजकीय संघटना आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *