Breaking News

1/breakingnews/recent

16 जानेवारी Good Morning सह्याद्री

No comments

  News24सह्याद्री -  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यव्यापी कोव्हिड लसीकरणाचा आज शुभारंभ....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES

1. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यव्यापी कोव्हिड लसीकरणाचा आज शुभारंभ

कोव्हिड-19 विषाणू प्रतिबंधात्मक राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सकाळी 11.30 वाजता मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड सुविधा केंद्रामध्ये होणार आहे.  तत्पुर्वी, देशव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सकाळी 10.30 वाजता विलेपार्लेतल्या डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

2. 5 ते 8 वीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरु
राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा येत्या 27 जानेवारीपासून सुरु होतील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. नुकतीच शिक्षण विभागाची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली. शाळा सुरू करताना विद्यार्थी व शिक्षक यांची पुरेशी कोरोनाविषयक काळजी घ्यावी अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांना केली  
3. राज्यातील हजारो शेतकऱ्यांचा 23 जानेवारीपासून एल्गार
गेल्या 50 दिवसांपासून दिल्लीत संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली लाखो शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकारच्या शेतकरी कामगारविरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी येत्या 23 जानेवारीपासून महाराष्ट्रात एल्गार पुकारण्यात येणार आहे. संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो शेतकरी कामगार मुंबईत चार दिवस ठिय्या आंदोलन करणार आहे.
4. नांदेडला समृद्धी महामार्गाशी जोडणार
नांदेड शहराला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाशी जोडण्यास राज्य शासनाने तत्वतः मंजुरी दिली आहे. नांदेडचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रकल्प साकारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे साडेसहा हजार कोटी रूपयांचा खर्च करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात अशोक चव्हाण यांनी या प्रकल्पाच्या तात्विक मान्यतेची माहिती दिली.  
5. मुंबई विमानतळावर पैसे घेऊन परदेशी प्रवाशांना अलगीकरणातून सूट
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा गैरव्यवहार उघडकीस आलाय. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणातून सूट देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून पैसे घेऊन चुकीच्या आणि अवैध पद्धतीने सूट देण्यात येत होती. हा प्रकार लक्षात येताच बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हे कृत्य करणाऱ्या दुय्यम अभियंत्यास तत्काळ निलंबित केले. या प्रकारची तातडीने चौकशी देखील सुरु करण्यात आली असून याप्रकरणी मनपा कर्मचाऱ्यांसह एकूण 3 जणांविरुद्ध महानगरपालिका प्रशासनाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली .
6. कल्याण - अंबरनाथ ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद 
कल्याण - अंबरनाथ ग्रामीण भागात काही दिवसांपासून ग्रामपंचायत निवडणूकीचे जोरदार वारे वहात होते. काल याच ग्रामीण भागामध्ये चांगल्या टक्केवारीने नागरिकांनी मतदान केले. शिवसेना राष्ट्रवादीची महाविकास आघाडी, भाजप आणि मनसे यांच्या पुरस्कृत पॅनलमध्ये निवडणुका पार पडल्या. खोणी, उसाटणे, वडवली आणि मल्लंगगड पट्ट्यात चुरशीची लढाई झाली. काल मतदारांना बाहेर काढण्याकरीता सर्वच पॅनलच्या उमेदवारांनी परिश्रम घेतल्याचे दिसून आले. नागरिकांनीहि त्याला उत्स्फुर्त असा प्रतिसाद दिला. निवडणुकीत गालबोट लागू नये म्हणून खोणी, वडवली या भागात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. 
7. उल्हासनगरात 11 लाख रुपयांचा गुटखा जप्त
उल्हासनगर कँम्प.नंबर चार परीसरात काल सायंकाळी एका बंद खोलीवर विठ्ठलवाडी पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 11लाख रुपये कीमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. त्यामुळे गुटखा माफीयांचे आता चांंगलेच धाबे दणाणले आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार विठ्ठलवाडी पोलीस व  अन्न,वऔषध प्रशासनाचे अधिकारी यांनी सदर ठिकाणी धाड टाकली असता एका बंद खोलीत 11 लाख रुपये कीमतीच्या गोवा व गुटख्याच्या गोण्या मिळुन आल्या असल्याचे विठ्ठल वाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कनैहया थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सदरचा गुटखा कोठुन व कुणी आणला,रुमचा मालक आणी भाडोत्री कोण आहे.याचा पोलीस तपास करत आहेत.
8. लोकांनी लस घेण्यासाठी घाबरू नये - जिल्हाधिकारी
अकोला जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर जिल्ह्यात ही तिचे लसीकरण सुरू होणार आहे. पहिली लस हि फ्रंटलाईन वोरीयर्सला देण्यात येणार आहे. जिल्हा स्त्री रुग्णालय, सामान्य रुग्णालय, आणि मनपाने दिलेल्या खासगी रुग्णालयात ही लस देण्यात येणार आहे. तसेच नऊ हजार कोव्हीशील्ड लस देणार आहोत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे. लोकांनी लस घेण्यासाठी घाबरू नये,असे आवाहनहि जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहेय.
9. रांजणगावात आगीत कापड दुकान भस्मसात  
औरंगाबाद वाळूज औद्योगिक वसाहतीत असलेल्या रांजणगाव शेणपुंजी येथील एका कापड दुकानाला काल भिषण आग लागली होती. या आगीत दुकानातील कपड्यासह फनिर्चर आदी जळून भस्मसात झाले असून अंदाजे दिड कोटी रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज दुकानमालकाने वर्तविला आहे. आगीची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मधुकर सावंत व अग्निशमन दल घटना स्थळी दाखल झाले. घटनास्थळी दाखल झाल्यांनतर पोलीस निरीक्षकांनी वरच्या मजल्यावर वास्तव्यास असणाऱ्या भाडेकरुंना सुरक्षित स्थळी हलविले. यानंतर दुकानातील पाठीमागील भिंत तोडून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
10. जालन्यात लसीकरणाला आजपासून सुरवात 
आज पासून कोरोनाच्या प्रत्यक्ष लसीकरणाला सुरूवात होणार आहे. त्यासाठी आरोग्य प्रशासन सज्ज झाले आहे. मात्र, नियोजित ठरलेल्या ठिकाणांपैकी आता फक्त चार ठिकाणीच आज लसीकरण होणार आहे. तर परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीमध्ये लसीकरणाचा ड्रायरन झाला होता. परंतु तांत्रिक अडचणीमुळे हे लसीकरण आता जिल्हा सामान्य रुग्णालयातील एका खाली इमारतीमध्ये होणार आहे. जालना जिल्ह्यात आज चार ठिकाणी या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. याचे उद्घाटन जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीमध्ये होणारे. सकाळी नऊ वाजता या लसीकरणाला सुरुवात होईल

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *