Breaking News

1/breakingnews/recent

11 जानेवारी Good Morning सह्याद्री

No comments

  News24सह्याद्री - राज्यावर ‘बर्ड फ्लू’चे सावट....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES

1. देशात १६ तारखेपासून लसीकरण
देशात करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम १६ जानेवारीपासून सुरू होणार असून जगातील या सर्वात मोठय़ा कार्यक्रमा अंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांसह करोनाविरोधी आघाडीवरील सुमारे तीन कोटी कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल.  

2. सोनू सूदनं जुहूमधील निवासी इमारतीत बेकायदेशीर बदल केल्याचा पालिकेचा आरोप  
जुहू येथील एका निवासी इमारतीमध्ये अनधिकृतपणे बांधकाम करून तिथं हॉटेल थाटल्याचा आरोप करत मुंबई महापालिका प्रशासनाने बजावलेल्या नोटीसीला आता सोनूने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्या याचिकेवर सोमवारी तातडीची सुनावणी पार पडणार आहे.

3. करोना काळात महाराष्ट्रात सर्वाधिक जैववैद्यकीय कचरा
 ऑक्टोबर महिन्यात जैविक कचऱ्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ५५०० टन होते.   

4. हरियाणात शेतकऱ्यांचा उद्रेक
लाठीमार, अश्रुधुराचा मारा, पाण्याचे फवारे झेलत आणि पोलिसांचे संरक्षक अडथळे तोडत हरियाणातील शेकडो शेतकऱ्यांनी रविवारी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या नियोजित किसान महापंचायत कार्यक्रमाच्या मंडपाची मोडतोड केली. त्यामुळे त्यांना हा कार्यक्रम रद्द करावा लागला.  

5. काश्मीरच्या अमशिपुरा चकमकप्रकरणी आरोपपत्र दाखल
आरोपी कॅप्टन भूपिंदर सिंग हे सध्या लष्कराच्या  कोठडीत असून, त्यांना कोर्ट मार्शलच्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

6. फडणवीस, पाटील यांना खास सुरक्षेची गरज नाही – गिरीश बापट 
कार्यकर्ता हीच त्यांची सुरक्षितता आहे, अशा शब्दात भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या बडय़ा नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केल्याची खिल्ली उडवली.  

7. राज्यावर ‘बर्ड फ्लू’चे सावट
महाराष्ट्र आणि दिल्लीत मृतावस्थेत आढळलेल्या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचे रविवारी केंद्रीय पशुपालन मंत्रालयाने स्पष्ट केले.

8. अंबरनाथ मध्ये ज्वलर्स दुकानावर दरोडा  
उल्हासनगर येथील शासकीय रुग्णालयात औषधोपचार सुरु आहेत.मात्र दिवसाढवळ्या झालेल्या हया हल्ल्यामुळे नागरीकांत भितीचे वातावरण पसरले आहे. 

9. भाजप कडून महिला सक्षमीकरना साठी विविध कार्यक्रम  
महिला सप्ताह देखील एमआयडीसी मधील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असल्याचे डोंबिवली भाजप ग्रामीण मंडळ चे अध्यक्ष नंदू परब यांनी सांगितले.

10. 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
नाशिकमध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. चाकूचा धाक दाखवून शेजाऱ्यांनीच बलात्कार केल्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी एका महिलेसह पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे.    

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *