Breaking News

1/breakingnews/recent

नारळाचे आरोग्यदायी फायदे

No comments



मुंबई -

आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्य आणि सौंदर्याबाबत अनेक समस्या निर्माण होत असतात. कधी कधी छोट्या-छोट्या समस्यांसाठी डॉक्टर आणि पार्लरमध्ये जाण्याची गरज असतेच असं नाहा.कारण या समस्यांना दूर करण्याचे उपाय आपल्या घरातच दडलेले असतात. जीवनशैलीमध्ये थोडासा बदल करून आणि काही घरगुती उपचारा करुन  तुम्ही निरोगी आयुष्य आणि सदाबहार सौंदर्य मिळवू शकता. आपल्या सर्वांच्या घरात नारळाचे तेल असतेच. कारण नारळाचे तेल अनेक गोष्टींसाठी उपयुक्त ठरते. या नारळाच्या  तेलाचा तुम्ही आरोग्य सुधारण्यासाठी आणि सौंदर्य वाढविण्यासाठी वापर करू शकता. यासाठी जाणून घेऊयात नारळाच्या तेलाचा आपल्या आरोग्य  आणि सौंदर्यावर काय परिणाम होतो.उन्हाळा सुरू झालाय. उन्हामुळे शरीराची लाही लाही होत असेल. अशावेळी थंड पेय पिण्याच्या मोह काही आवरता येत नाही. पण कोल्ड ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स आणि इतर कोर्बाहार्ड्रेड पेयांपेक्षा नारळपाणी पिणे अत्यंत फायदेशीर ठरले. पहा काय आहेत नारळपाण्याचे फायदे.

१. डिहायट्रेशन

नारळाचे पाणी कार्बोहायड्रेटचा उत्तम स्त्रोत आहे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि पोटाच्या इतर समस्या दूर होण्यास मदत होते. नारळपाण्यात लिंबाचा रस घालून प्यायल्यास शरीरातील पाण्याची कमतरता भरुन निघते.

२. वजन कमी करण्यास मदत

सकाळी व्यायामानंतर नारळपाणी पिणे लाभदायी ठरते. नारळपाण्यात कमी प्रमाणात कॅलरीज असतात. नारळपाण्यात अनेक प्रकारचे बोयोअॅक्टीव्ह एन्जाईम्स असतात. नारळपाणी प्यायल्याने पोट भरलेले राहते. त्यामुळे भूक कमी लागते. परिणामी तुम्ही कमी खाता.

३. उच्च रक्तदाबावर गुणकारी

नारळपाण्याचा उपयोग उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास होतो. यात असलेल्या व्हिटॉमिन सी, पोटॅशियम आणि मॅग्नेशियममुळे रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते.

४. डोकेदुखीवर आराम

शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स आणि पाण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी नारळपाणी फायदेशीर ठरते. डोकेदुखी असणाऱ्यांमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण कमी होते. नारळपाण्याने ती कमतरता भरुन काढली जाते. परिणामी डोकेदुखीवर आराम मिळतो.

५. हॅंगओव्हरवर लाभदायी

हॅंगओव्हरपासून सुटका मिळवण्यासाठी नारळपाणी लाभदायी आहे. यातील इलेक्ट्रोलाईट्समुळे शरीराला ऊर्जा मिळेत. त्यामुळे थकवा दूर होऊन ताजेतवाने वाटते.

६. नारळाचे तेलाचे सौंदर्य वाढविण्यासाठी फायदे

बाह्य सौंदर्यांपेक्षा खरंतर तुमचं मन आणि विचार किती सुंदर आहेत हे फार महत्त्वाचं असतं. पण असं असलं तरी तुमच्या बाह्यसौदर्यांकडे दुर्लंक्ष करून मुळीच चालणार नाही. कारण सर्वात आधी तुमची ओळख तुमचं सौंदर्यच करून देत असतं. त्यामुळे सुंदर दिसण्यासाठी मुली अनेक प्रयत्न करत असतात. काहीजणी तासनतास पार्लरमध्ये वेळ घालवतात तर काहीजणी निरनिराळे प्रयोग घरीच करत बसतात. काहीही करण्याआधी एक गोष्ट जरुर लक्षात ठेवा की, बाजारातील केमिकलयुक्त उत्पादनांचा तुमच्या त्वचेवर विपरित परिणाम होऊ शकतो. शिवाय जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्हाला बाजाारातील उत्पादने काळजीपूर्वकच वापरावी लागतात. पण याऐवजी तुम्ही नारळाच्या तेलाचा सौंदर्य वाढविण्यासाठी वापर केला तर तुम्हाला काळजी करण्याचे मुळीच कारण नाही. कारण नारळाच्या तेलाचे तुमच्या सौदर्यावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

७. क्रीम ब्लश 

ब्लशींग करण्यासाठी चेहऱ्यावर क्रीम लावा आणि हाताच्या बोटांनी चीकबोन्सवर थोडसं नारळाचं तेल लावा. त्यानंतर अगदी हलक्या हाताने त्यावर थोडंसं मसाज करा. तेल त्वचेवर मुरल्यावर गालांवर थोडीशी लिपस्टिक लावा आणि ती व्यवस्थित मर्ज करा. तुमचे ब्लश चीक तयार आहेत.

८. स्क्रबर

हिवाळ्यात तुमच्या त्वचेवरील डेड स्कीन काढण्यासाठी नारळाच्या तेलाचा वापर एखाद्या स्क्रबरप्रमाणे केला जाऊ शकतो.. कारण नारळाच्या तेलातील गुणधर्मांमुळे त्वचेवरील डेड स्कीन निघून जाते. यासाठी नारळाच्या तेलात साखर मिसळून तुम्ही घरीच हा स्क्रब तयार करू शकता.

९. मेकअप रिमूव्हर

ज्यांची त्वचा अती संवेदनशील आहे असे लोक बाजारातील कोणतेही उत्पादन त्वचेवर लावण्यास घाबरतात. त्यामुळे जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर नारळाचे तेल तुमच्यासाठी अगदी उत्तम ठरेल. तुम्ही मेकअप रिमूव्हल म्हणुन नारळाच्या तेलाचा वापर करू शकता. हिवाळ्यात नारळाच्या तेलाने मेकअप काढल्यामुळे त्वचा कोरडी होत नाही. डोळ्यांच्या खालील त्चचा खूपच नाजूक असते. नारळाच्या तेलामुळे या त्वचेचे चांगले पोषण होते. डोळ्यांच्या खाली सुरुकुत्या येऊ नये यासाठी त्या भागावर नारळाचे तेल लावून मसाज करा.

१०. नैसर्गिक मॉश्चराईझर

नारळाच्या तेलामुळे डेड स्कीन कमी होते आणि त्वचा नितळ दिसू लागते. शिवाय याचे कोणतेही दुष्परिणाम होत नसल्यामुळे कोणत्याही त्वचा समस्येवर नारळाच्या तेलाचा वापर करू शकता. नारळाचे तेल एक उत्तम मॉश्चराईझर आहे.

११. नखांची काळजी घेण्यासाठी 

महिलांमध्ये नखे तुटण्याची समस्या वारंवार दिसून येते. जर तुम्हाला ही समस्या दूर करायची असेल तर नखांना नियमित नारळाचे तेल लावा. ज्यामुळे तुमची नखे तुटणार तर नाहीतच शिवाय ती सुंदरही दिसतील.

१२. डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी

रात्रीचं जागरण आणि ताण यामुळे तुम्हाला डार्क सर्कल्सची समस्या होत असेल तर कापसाच्या मदतीने डोळ्यांच्या खाली नारळाचे तेल लावा. या उपायामुळे तुमचे डार्क सर्कल्स कमी होतील.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *