Breaking News

1/breakingnews/recent

18 जानेवारी सह्याद्री वेगवान आढावा

No comments

   News24सह्याद्री - मोदी सरकारनं निवडणुकीसाठी बालाकोटचा वापर केला -पाक...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES


1. देशात ४४७ जणांमध्ये दिसले लसीचे साइड इफेक्ट  
लसीचा प्रतिकूल परिणाम झालेल्या तिघांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने रविवारी दिली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील नगरमधील आठ आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनाही करोना लसीचा त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे.  

2. मोदी सरकारनं निवडणुकीसाठी बालाकोटचा वापर केला -पाक पंतप्रधान
 देशात विरोधी पक्षांकडून या संवादाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात असतानाच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही गोस्वामी यांच्या व्हायरल झालेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकार भारताला वाईट देशांच्या गर्तेत ढकलत आहे,” असं विधान खान यांनी केलं आहे.  

3. राणेंना शिवसेनेचे दे धक्का
 मतमोजणीचे प्राथमिक कल हाती आले असून काही ठिकाणाचे निकालही हाती येण्यास सुरुवात झाली आहे. कोकणामधील कणकवली तालुक्यातील भिरंवडे ग्रामपंचायतीच्या निकालाच्या माध्यमातून राणे कुटुंबाला शिवसेनेने पाहिला धक्का दिल्याची माहिती समोर येत आहे.  

4. पाकिस्तानात ‘सिंधूदेश’च्या मागणीला जोर
मोर्चेकरांनी मोदींसह जगभरातील प्रमुख नेत्यांचे फोटो असलेले फलक हातात घेऊन या आंतरराष्ट्रीय समुदयाने आमच्या स्वातंत्र्य लढ्यात हस्तक्षेप करावा अशी मागणी केली. यावेळी मोर्चेकरांनी स्वतंत्र सिंधू राष्ट्राच्या घोषणाही दिल्या.

5. Vaccine घेतल्यानंतर 24 तासांत वॉर्डबॉयचा मृत्यू
नागरिकांना लसीमुळे साईड इफेक्ट झाल्याचे देखील समोर येत आहे. नुकताच मोरादाबाद येथे जिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या एका 46 वर्षीय वॉर्डबॉयने कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर दुसऱ्या त्यांचा दिवशी मृत्यू झाला.  

6. रॉबर्ट वाड्रा यांची EDच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी
शिवाय दाखल केलेल्या अर्जामध्ये रॉबर्ट वढेरा आणि महेश नागर यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची परवानगी मागितली आहे. या प्रकरणाची सुनावणी सोमवारी म्हणजे आज राजस्थान हाय कोर्टात होणार आहे  

7. चंद्रशेखर बावनकुळेंचे प्रस्थ कायम. 
नागपुरातील कोराडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गटाने विजय प्राप्त केला आहे. या गटाने एकूण 17 पैकी 15 जागांवर विजय मिळवत येथील कोरोडी ग्रामपंचतवर भाजपचा झेंडा फडकवला आहे  

8. 22 जागांवर मोहिते-पाटील गटाचा विजय 
मोहिते पाटील गटाचा हा विजय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का आणि भाजपसाठी मोठा विजय ठरला आहे. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे 

9. औरंगाबादमध्ये महिलांचा विक्रम, पूर्ण 9 जागांवर विजय
 औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात ढाकेफळ ग्रामपंचायतीमध्ये हा निकाल लागला असून गावात एकच जल्लोष पाहायला मिळत आहे. गावकऱ्यांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात महिलांना संधी दिली होती. त्यामुळे हा विक्रम पाहायला मिळत आहे  

10. पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचा जोरदार धक्का
 रविवारी पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यानं इथं धरणी हादरली
रविवारी रात्री दहा वाजून पाच मिनिटाच्या सुमारास या भागात भूकंपाचा धक्का जाणवला, स्थानिकांनी याबाबतची माहिती दिली.
 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *