Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - आजी-आजोबांची हेलिकॉप्टर मध्ये बसण्याची हौस पुरी

No comments

   News24सह्याद्री - आजी-आजोबांची हेलिकॉप्टर मध्ये बसण्याची हौस पुरी...पहा जिल्ह्याची खबरबात




TOP HEADLINES


1. आजी-आजोबांची हेलिकॉप्टर मध्ये बसण्याची हौस पुरी
 महाराष्ट्रात प्रथमचआजी-आजोबांना हॅलिकॉप्टरमध्ये बसवून हौस पूर्ण करण्याची ही पहिलीच वेळ असावी या घटनेने आजी-आजोबा सुखावले आहेत.. याप्रसंगी समाजप्रबोधनकार हरिभक्त परायण इंदुरीकर महाराज यांच्या  कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

2. साईदर्शनासाठी भाविकांना ठरावीक दिवशीच मिळणार पास
भाविकांनी दर्शनासाठी ऑनलाईन पास काढूनच यावे असं आवाहन करण्यात आलंय. साईसंस्थानचे पास वितरण केंद्र गुरुवार, शनिवार, रविवार आणि सुट्या व  सणांच्या दिवशी  बंद ठेवण्याचा निर्णय संस्थानाने घेतला
 
3. भाव वाढताच शेतकऱ्यांनी बंद पाडला कांदा लिलाव
 भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे आणि बाजार समितीचे सभापती ॲड. अनिल मडके, यांनी दर वाढविण्याच्या केलेल्या  मध्यस्थीने पुन्हा लिलाव सुरू झाले. दुपारी १२ वाजता कांदा लिलाव सुरू झाला असताना व्यापाऱ्यांनी एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल २ हजार ३०० ते २ हजार ६०० रुपये असा कमी दराने लिलाव सुरू केला.

4. दुचाक्या चोरणारा अट्टल दरोडेखोर जेरबंद
 श्रीगोंदा, कर्जत, बेलवंडी पोलीस स्टेशनला विविध गुन्ह्यांमध्ये फरार असणारा अट्टल दरोडेखोर शिवाजी काळे याला अटक झाल्यामुळे त्याच्याकडून केलेल्या गुन्ह्यांची उकल होणार आहे

5. रोहित पवारांचे दमबाजीचे आरोप फेटाळताना माजी मंत्र्याचा मोठा गौप्यस्फोट
मी आता कोणाला दमदाटी करण्याचा प्रश्नच नाही,’ असे सांगत माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांना टोला लगावला आहे. ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करणे आणि कार्यकर्त्यांना दमबाजी करणे यावरून या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.  

6. राजुरी शिवारात जळीत हत्याकांड
 पहाटेच्या सुमारास हि घटना घडल्याचं समजतंय. सकाळी तेथून जाणाऱ्या लोकांच्या निदर्शनास हि घटना आल्या नंतर लोणी पोलिसांना याबाबत कळवण्यात आल त्यानंतर लोणी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास सुरु केलाय

7. बोलेरोची बुलेटला धडक, दोघे गंभीर जखमी
बुलेट वरील प्रवासी कुठले आहेत हे समजु शकले नाही तर चारचाकीतील प्रवासी पाथर्डी आष्टी तालुक्यातील असल्याचे पोलिस सुत्रांकडून समजले. पुढील तपास सुपा पोलीस करत आहेत.

8. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीत नगर जिल्ह्यातील शेतकरी नेत्याचा समावेश
समितीत  शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांच्या रूपाने नगर जिल्ह्यातील शेतकरी नेत्याला स्थान मिळाले, या समितीत भारतीय किसान युनियनचे नेते भूपेंदर सिंह मान, अंतरराष्ट्रीय खाद्य नीती संस्थेचे डॉक्टर प्रमोद कुमार जोशी, कृषी अर्थतज्ञ अशोक गुलाटी आणि शेतकरी संघटनेचे नेते अनिल घनवट यांचा समावेश आहे

9. पोकळ आश्वासनाला कंटाळून ग्रामस्थ निवडणुकीवर बहिष्कार घालणार
ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेल्या पदाधिकार्‍यांच्या निष्क्रीयतेला कंटाळून नागरिकांनी होणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

10. शॉर्टसर्किटमुळे सव्वा एकर ऊस जळून खाक
आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केला परंतु आगीचे स्वरुप वाढत गेल्याने ग्रामस्थ देखील हतबल झाले.ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याहुन अग्निशमन बंब येई पर्यंत उस पूर्णपणे जळून गेला होता.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *