जिल्ह्याची खबरबात - रोहित पवार यांच्या मतदारसंघातील ग्रामपंचायत बिनविरोध
जिल्ह्याची खबरबात - रोहित पवार यांच्या मतदारसंघातील ग्रामपंचायत बिनविरोध
TOP HEADLINES
1. चोरटी वाळू वाहतूक करणारा मुद्देमालासह अटक
शिवाजीनगर रस्त्यावर करण्यात आली ट्रॅक्टर चालक लक्ष्मण शामराव सदाफुले यांनी ट्रॅक्टर मालकाचे नाव सांगण्यास नकार दिला या प्रकरणी ट्रॅक्टर चालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय
2. महिलांना हायजिन किट चे वाटप करण्यात आले
स्त्रीरोग तज्ञ् डॉ. माया पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली "महिला अंतरंग स्वच्छता जागृती उपक्रम " घेण्यात आला ,या कार्यक्रमात डॉ माया पोकळे यांनी महिलांच्या स्वछते बद्दल मार्गदर्शन केले व महिलांनी सुद्धा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या शंका डॉक्टरांना विचारल्या कार्यक्रमाच्या अखेरीस महिलांना विशेष भेटवस्तू म्हणून हायजिन किट चे वाटप करण्यात आले .
3. केंद्र शासनाने साखर कारखान्यांसाठी विशेष पॅकेज घोषित करावे
केंद्र शासनाने साखरकारखाना करिता विशेष पॅकेज घोषित करावी अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री तथा केदारेश्वर कारखान्याचे संस्थापक बबनराव ढाकणे यांनी केले बोधेगाव येथील केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे यंदाच्या हंगामात उत्पादित केलेल्या एक लाख 1 व्या साखर पोते पूजन समारंभात ते बोलत होते
4. खासगी आराम बस घुसली दुकानात
नगर-कल्याण महामार्गावरून मुंबईकडे जाणारी खासगी आराम बस टाकळी ढोकेश्वर वासुंदे चौकातील वळणावर नियंत्रण सुटल्याने दुकानात घुसली या अपघातात चालक जखमी झाला असून बस वाळूत रुतल्याने मोठा अपघात टळला यात दोन दुकानांचे मोठे नुकसान झाले तर दोन दिवसांपासून या चौकात अपघाताची मालिका कायम आहे
5. आज 75 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज
अहमदनगर जिल्ह्यात आज 75 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 67 हजार 301 इतकी झाली आहे रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाणे आता 97.3 टक्के इतके झाले
6. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना
रेडियम रिफ्लेक्टचे वाटप
शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी अमृत संजीवनी पोलीस उपनिरीक्षक शरद नांगरे पाटील सरपंच तसेच कर्मचारी उपस्थित होते
7. शनिशिंगणापूर देवस्थानाच्या अध्यक्षपदाबाबत उत्सुकता
शनिशिंगणापूरच्या शनेश्वर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची निवड या आठवड्यात होत असून अध्यक्ष कोण होणार याबाबत उत्सुकता लागली आहे अध्यक्षपदासाठी शिवाजी दरंदले आप्पासाहेब शेठ व भागवत बनकर यांच्या नावाची चर्चा असून कोणाला ही संधी मिळणार याची चर्चा झडत आहे
8. रोहित पवार यांच्या मतदारसंघातील ग्रामपंचायत बिनविरोध
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा ही मागणी काही पुढाऱ्यांनी केली आहे दरम्यान नुकतेच आमदार रोहित पवार यांचा मतदारसंघ जामखेड मध्ये एका ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे तालुक्यातील खूरदेठंन ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली
9. स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द
एकाच व्यक्तीचे दोन नावे धान्य वाटपाची यादी समाविष्ट केल्याचे त्यात म्हटले होते त्यावरून मंडळ अधिकारी तसेच पुरवठा विभागाचे अव्वल कारकून यांना दुकान तपासणीचे आदेश देण्यात आले होते चौकशीत आढळून आलेल्या बाबींचा अहवाल पुरवठा अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला तर या अहवालात गंभीर आक्षेपानंतर दुकानाचा परवाना रद्द करण्यात आलाय
10. ढगाळ वातावरणामुळे बळीराजा चिंतेत
शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते 5 ते 12 जानेवारी दरम्यान राज्यात नगर सह उत्तर महाराष्ट्र तसेच विविध भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे
No comments
Post a Comment