Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - सुरभी हॉस्पिटलचा रविवारी लोकार्पण सोहळा

No comments

News24सह्याद्री  सुरभी हॉस्पिटलचा रविवारी लोकार्पण सोहळा...पहा शहराची खबरबात


TOP HEADLINES


1. सुरभी हॉस्पिटलचा रविवारी लोकार्पण सोहळा 

शहरातील अत्याधुनिक उपचारांच्या सुविधेमुळे अल्पावधीतच नावलौकिक मिळवलेल्या सुरभि हॉस्पिटल मधील नव्या प्रशस्त २०० खाटांच्या विस्तरित रुग्णालयाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते येत्या रविवारी म्हणजेच २४ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता होणार असल्याची माहिती सुरभी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉक्टर राकेश गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या लोकार्पण सोहळ्याला आमदार अरुणकाका जगताप, पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह आमदार संग्राम जगताप यांची उपस्थिती असणार असल्याची माहिती डॉ राकेश गांधी यांनी दिली आहे. 


2. कचरा टाकण्याच्या वादातून खुनी हल्ला
घराजवळ कचरा टाकण्याच्या वादातून झालेल्या भांडणाचा राग येऊन शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत धारदार चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शहरातील पिंगारा हॉटेल जवळ घडली आहे.  याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फैयाज शेख या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सैफ मेहमूद शेख यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.

3.रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ
वाहन चालवताना सीटबेल्ट लावल्यास तसेच हेल्मेट परिधान केल्यास रस्ता अपघाता दरम्यान होणारी जीवितहानी निश्चित टळू शकते असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी केले. तर भारत सरकारच्या सडक परिवहन मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्वर्गवासी रामलालजी ललवाणी मेमोरियल फाउंडेशनच्यावतीने स्वयंप्रेरणेने सीटबेल्ट लावणारे व हेल्मेट वापरणाऱ्या वाहनचालकांचा गुलाब पुष्प व नववर्षाचे पॉकेट कॅलेंडर देऊन रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते

4. ग्रामपंचायत निवडणुकीत कर्डिले यांना धक्का - प्रा. गाडे
नगर तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तालुक्यातील जनतेने माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना चांगलाच धक्का दिलाय. तालुक्यातील 60% ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला असल्याचा दावा शिवसेनेचे जिल्ह प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे यांनी केलाय. निवडणूक निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते

5. शहरासाठी निधी कमी पडू देणार नाही - आ. जगताप
भविष्यात नगरमध्ये चांगली कामे उभे राहतील यासाठी आपण प्रयत्नशील असून नगरसेवकांच्या मदतीने प्रत्येक भागाचा विकास करण्यात येत आहे. नगर शहराच्या विकासासाठी आपण राज्य शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा सुरू असून शहरातील अनेक भागात कामे सुरू आहे. या कामांमधून शहरातील प्रलंबित कामांना चालना मिळणार आहे. कोंबडीवाला मळा व परिसरातील अनेक कामांसाठी मोठ्या निधीची गरज असून लवकरच उपलब्ध करून ते काम मार्गी लावू नगरसेवक अविनाश फुले प्रभागातील प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेत आहोत अशा स्वरूपाच्या कामातून एक आदर्श प्रभाग निर्माण झाल्यास नगर शहरही आदर्शवत होईल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. प्रभाग क्रमांक 11 मधील कोंबडीवाला मळा येथील ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *