Breaking News

1/breakingnews/recent

29 डिसेंबर सह्याद्री वेगवान आढावा

No comments

   News24सह्याद्री - भर रस्त्यात तरुणावर हल्ला करुन हत्या..पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES

1. देशभरात मागील २४ तासांत २४ हजार ९०० जण करोनामुक्त

तर १६ हजार ४३२ नवे करोनाबाधित आढळले असून, २५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १ कोटी २ लाख २४ हजार ३०३ वर पोहचली आहे.  

2. करोनाच्या लसीत वापरण्यात आलंय गायीचं रक्त
 स्वामी चक्रपाणि यांनी करोनाच्या लसीमध्ये गायीचं रक्त वापरण्यात आल्याचा दावा केला आहे. गायीचं रक्त असणारी ही लस देशामध्ये वापरण्याची परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी स्वामी चक्रपाणि यांनी केलीय.

3. अ‍ॅमेझॉन पुन्हा वादात
 अ‍ॅमेझॉनच्या किंडल एडिशनवर मुस्लीम पुरुष आणि हिंदू स्त्रियांमधील संबंधांवर अश्लील पद्धतीने भाष्य करणारी अनेक पुस्तके उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे  

4. करोनाच्या नव्या प्रकाराचा भारतात शिरकाव
वेगानं पसरणाऱ्या करोनाच्या या नवीन प्रकारानेही जगभरात हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत १६ देशात पोहोचलेल्या करोनाच्या नव्या प्रकाराने आता भारतातही शिरकाव केला आहे. देशात करोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झालेले सहा रुग्ण आढळून आले आहेत.

5. भररस्त्यात तरुणावर हल्ला करुन हत्या
 हत्येचा व्हिडीओही कोणीतरी शूट केला. मात्र घटना रोखण्यासाठी किंवा पीडित व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याकरिता मदतीला कोणीच पुढे आलं नाही. उत्तर प्रदेशातील गाजियाबादमध्ये ही घटना घडली आहे. हत्येचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

6. विधान परिषद उपसभापतींची आत्महत्या
 धक्कादायक बाब म्हणजे रेल्वे रुळावर त्यांच्या मृतदेह आढळून आला. पोलिसांना मृतदेह सापडलेल्या ठिकाणी धर्मगौडा यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली सुसाईड नोटही सापडली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *