जिल्ह्याची खबरबात - रोहित पवारांवर कारवाई करा- राम शिंदे
News24सह्याद्री - रोहित पवारांवर कारवाई करा- राम शिंदे...पहा जिल्ह्याची खबरबात
TOP HEADLINES
1. रोहित पवारांवर कारवाई करा- राम शिंदे
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली. 'अशा पद्धतीने निवडणूक बिनविरोध करण्याची प्रथा पडली तर भविष्यात टाटा, बिर्ला आमदार-खासदार होतील,' असा टोलाही त्यांनी पवार यांना लगावला.
2. ग्रामपंचायत निवडणुक : उमेदवारांची लगीनघाई
कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन केले जावे असं आवाहन वारंवार उपस्थितांना करण्यात येत होते . तर आपला उमेदवारी अर्ज मुदतीत दाखल व्हावा यासाठी इच्छुकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र तहसील कार्यालय आवारांमध्ये पाहायला मिळाले .
3. जामखेड तालुक्यात कर्करोग प्राथमिक तपासणी शिबिर
डॉ. अभिनव सोनवणे, डॉ. कोमल जैन डॉ. सदाफुले यांनी ५१ रुग्णांची तपासणी करून रुग्णांनवर उपचार केले . तर आ.रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत - जामखेड एकात्मिक विकास संस्था तसेच भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट संचलित इंटिग्रेटेड कँन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर वाघोली पुणे यांच्या सहकार्याने हे शिबीर घेण्यात आले .
4. राहुरी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीची धामधूम सुरु
आज
सलिम शेख यांच्या कार्यकर्त्यांनी
मुळानगर ते राहुरी अशी मोटार सायकल रॅली मोठ्या उत्सवात काढण्यात आली .
5. बांधावरून दोन शेतकरी कुटुंबामध्ये तुफान मारामारी झाली
दत्तात्रय ठोंबरे असं खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे . दरम्यान या प्रकरणातील संशयित आरोपी घटनेनन्तर पसार झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली ,
6. ग्रामपंचायतीना सी एस आर फंडाच्या माध्यमातून अधिकचा निधी दिला जाणार
जामखेड तालुक्यात ४९ गावांच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडणार असून ,बिनविरोध निवडणुका पार पडलेल्या मोठ्या ग्रामपंचायतीना सी एस आर फंडाच्या माध्यमातून अधिकचा निधी दिला जाणार असल्याबाबत आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले .
7. शिर्डीतून बेपत्ता झालेली इंदूरची महिला पळाली होती प्रियकरासोबत
एका प्रकरणाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले असले तरी, मधल्या काळात शिर्डीतून मानवी तस्करी होते की काय, असा सवाल उपस्थित होऊन शिर्डीची मोठी बदनामी झाली होती.
8. पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या नवीन बांधलेल्या भिंतीला भगदाड
काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निगराणीखाली सुरु असताना अश्या प्रकारे सरकारी मालमत्तेचं नुकसान कोण करतय हा प्रश्न नागरिक उपस्थित करताहेत .
9. शिर्डीतील मंदिर उद्या रात्रभर खुले राहणार
शिर्डी संस्थानच्या वतीने ही माहिती देण्यात आली. मात्र, भक्तांनी दर्शनाला येताना ऑनलाइन पास घेऊनच यावे, असेही संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी स्पष्ट केले आहे.
10. तळेगाव दिघे चौफुली परिसरात वाढीव रस्ता डांबरीकरणास सुरवात
सार्वजनिक बांधकाम उपविभाग संगमनेर अंतर्गत हे डाबरीकरणाचं काम करण्यात येत आहे . तर या परिसरातील रस्त्याची दुर्दशा झाल्याने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे अशी मागणी नागरिक वारंवार करत होते , अखेर या मागणीची दाखल घेत रस्ता दुरुस्तीसह डांबरीकरणाच्या कामाला सुरवात झाली आहे .
No comments
Post a Comment