Breaking News

1/breakingnews/recent

25 डिसेंबर सह्याद्री सुपरफास्ट

No comments

News24सह्याद्री - मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला अपघात....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES

 1. शेतकऱ्याला भविष्याच्या दृष्टीने तयार करण्यावर सरकारचा भर : पंतप्रधान मोदी

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधी वितरण करण्याच्या योजनेचा शुभारंभ केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी देशातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. ऑनलाईन पद्धतीनं झालेल्या या कार्यक्रमात 1 बटन दाबून 9 कोटी शेतकरी लाभार्थ्यांना 18 हजार कोटी रुपये थेट बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेचा शुभारंभ पंतप्रधानांनी केला. पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 6 हजार रुपये थेट अनुदान दिलं जातं. 2 हजार रुपयाप्रमाणं तीनवेळा ही रक्कम बँकेत जमा होते.
  ==============  
2. जदयूच्या सात पैकी सहा आमदारांनी केला भाजपात प्रवेश
भारतीय जनता पार्टीने एनडीएमधील आपला सहकारी पक्ष असलेल्या जदयूला मोठा झटका दिला आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या भाजपाने अरुणाचल प्रदेशमध्ये नितीश कुमार यांच्या सहा आमदारांना फोडलं आहे. अरुणाचलमध्ये जदयूचे सात आमदार आहेत, त्यापैकी सहा आमदारांनी आता भाजपामध्ये  प्रवेश केला आहे.  
  ==============      
3. असदुद्दीन ओवेसींनी साधला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा
उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर दंगलीशी निगडीत प्रकरणी भाजपा नेत्यांवरील दाखल खटले मागे घेतल्या गेल्याच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
“२०१७ मध्ये उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांच्या विरोधात दाखल झालेले खटले मागे घेतले होते. आता ते त्यांच्या उर्वरीत सहकाऱ्यांबरोबर उभे आहेत. जेव्हा सरकारच गुन्हेगारांचं होतं, तेव्हा सर्वात आधी न्यायाची हत्या होते.” असं एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विटद्वार म्हटलं आहे.
 ==============  
4. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला अपघात
नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde accident) यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती आहे. गुरुवारी 24 डिसेंबरला वाशी टोल (Vashi Toll) नाक्यावर मुंबईच्या दिशेने जाताना गाडीला अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या अंगठ्याला थोडीफार दुखापत झालंचं समजतंय. अंगठ्याची दुखापत वगळता शिंदे यांच्या प्रकृती उत्तम आहे.
  ==============  
5. आमची सर्व जागा लढण्याची तयारी-भाई जगताप
आगामी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष सर्व 227 जागांवर लढण्यासाठी तयार आहे, असे वक्तव्य मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप  यांनी केले. भाई जगताप यांनी शुक्रवारी शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बाळासाहेब यांच्या सर्व स्मृतिदिनाला मी नेहमी येतो, राजकारणाच्या पलिकडे काही व्यक्तींचं स्थान असतं, इथे प्रेरणा मिळते, आज आणि उद्या सर्व महान व्यक्तींच्या प्रेरणा स्थळावर जाणार असल्याचे भाई जगताप यांनी सांगितले  
  ==============    
6. छगन भुजबळ यांनी रस्त्यावर उतरत सोडवली टोल नाक्यावरची वाहतूक
नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर लोक मुंबईहून बाहेर जाण्याचा पर्याय निवडत आहेत. मार्च महिन्यापासून लॉकडाउन असल्याने अनेकांना मे महिन्याच्या सुट्टीतही बाहेर जाता आलं नव्हतं. आता मात्र अनलॉकच्या दरम्यान प्रवासाची मुभा देण्यात आल्याने अनेक लोक मुंबईबाहेर जात आहेत. अशा परिस्थितीत मुंबई नाशिक महामार्गावरुन जात असताना महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ घोटी टोल नाक्याजवळ वाहतूक कोंडीत अडकले होते. त्यांची कार जेव्हा घोटी टोल नाक्याजवळ आली तेव्हा त्यांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यावेळी त्यांनी स्वतः आपल्या कारमधून उतरुन वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हातभार लावला.  
==============
7. मुरुड जंजिरा किल्ल्याचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद  
मुरुड जंजिरा किल्ल्याचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत. किल्ल्यावर पर्यटकांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांच्या सुचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. २ जानेवारीपर्यंत किल्ल्याचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद राहणार आहेत.
  ==============
8. मनसे-अ‍ॅमेझॉन वादात फ्लिपकार्टची बाजी
अ‍ॅमेझॉनने आपल्या अ‍ॅपवर आणि संकेतस्थळावर मराठीचा वापर करावा यासाठी मनसे-अ‍ॅमेझॉनचं रस्त्यावरचं भांडण आता न्यायालयात गेलं असताना अ‍ॅमेझॉनची मुख्य स्पर्धक कंपनी फ्लिपकार्टनं मात्र मराठीचा स्वीकार केल्याचं दिसून आलंय.  
    ==============
9. पुण्यानंतर मुंबईतील अ‍ॅमेझॉनची कार्यालयं फोडली
मराठीच्या मुद्द्यावरुन मनसे प्रचंड आक्रमक झाली असून पुण्यानंतर मुंबईतील अ‍ॅमेझॉनची कार्यालयं फोडली आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी चांदिवली येथील अ‍ॅमेझॉनच्या दोन कार्यालयात घुसून तोडफोड केली आहे. याआधी अ‍ॅमेझॉनचं पुण्यातील कार्यालय फोडण्यात आलं. पुण्यातील कोंढवा भागातील ॲमेझोनच्या कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांकडून ‘मराठी नाय तर अ‍ॅमेझॉन नाय’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.  
  ==============  
10. विराटच्या जागी सेहवाग असता तर कधीच परत आला नसता
भारतीय संघाचा नियमीत कर्णधार विराट कोहली पितृत्वाच्या रजेमुळे पहिल्या कसोटी सामन्यानंतर मायदेशी परतला आहे. विराट कोहली मालिका अर्धवट सोडून मायदेशी परतल्यामुळे त्याला टीकाचा सामना करावा लागत आहे. काही जणांनी विराटच्या निर्णयाचं स्वागत केलं तर काहींनी टीका केली. विरेंद्र सेहवागचे प्रक्षिशक ए. एन. शर्मा यांनाही उडी घेतली आहे. या परिस्थितीत सेहवाग असता तर तो कोहलीसारखा मायदेशी परतला नसता, असी टिप्पणी शर्मा यांनी केली आहे.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *