Breaking News

1/breakingnews/recent

स्पेशल रिपोर्ट - राष्ट्रीय शेतकरी दिवस

No comments

       News24सह्याद्री - राष्ट्रीय शेतकरी दिवस...पहा सह्याद्री special रिपोर्ट




आज "राष्ट्रीय शेतकरी दिन" माजी पंतप्रधान श्री. चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस. २३ डिसेंबर, देशभरात त्यांच्या शेती आणि शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याच्या सन्मानार्थ  शेतकरी दिन म्हणून पाळला जातो. उत्कृष्ठ शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असे समजण्याचा काळ बदलत जाऊन शेतीचा क्रम दिवसेंदिवस खाली खालीच येत गेला. शेती म्हणजे आतबट्ट्याचा धंदा किंवा शिक्षण, नोकरी, व्यवसाय नाही म्हणून करायचा उद्योग उरत गेला.. त्यामागे काय कारणे असू शकतात? हा प्रश्न आज शेतकरी दिनानिमित्त पडला पाहिजे. शेतकऱ्याला बळीराजा हे संबोधन दिले जाते. दानविर बळीराजाची गोष्ट प्राथमिक शाळेतच शिकविली जाते, पुढे जाऊन पुराणात वामनाने तीन पावलं धरतीचे दान मागून बळीराजाला नरकाच्या द्वाराचा द्वारपाल केल्याची गोष्ट देखील सर्वश्रुत आहे.

खरोखर आज शासन वामनाची भूमिका तर निभावत नाही ना?निसर्गाचा लहरीपणा, अधुरी साधनसामुग्री किंवा आधुनिक शेतीचे ज्ञान आणि बाजार ही तीन पावले त्याला नरकाच्या द्वाराकडे तर ढकलत नाहीत ना?काहीही असो, आज अशीही काही उदाहरणे आहेत ज्यांनी इतर चांगल्या अनेक संधी डावलून आधुनिक शेतीचा स्वीकार केला. नफ्यातोट्याचा अभ्यास करून, बाजाराचा अंदाज घेऊन, पिकं आणि वाणांची योग्य निवड करून शेती करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या कष्ट व चिकाटीच्या बळावर तो योग्य असल्याचे सिद्धही करून दाखविले.शासकीय योजना आणि धोरणांचा पुरेपूर लाभ घेत, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून केलेली भांडवली शेती इतर व्यवसायां प्रमाने फायद्यात येऊ शकते हे आता सिद्ध झाले आहे. त्यासाठी अभ्यास करून त्याला कष्टाची जोड देणारा, निश्चयाने आणि खंबीरपणे उभा राहणारा तरुण शेतकरी वर्ग असायला हवा. चित्र हळू हळू पालटत आहे. तरुण शेतकरी आता निसर्गावरच अवलंबून राहणारी शेती करत नाही. 

आपल्या हक्कासाठी शासनाला प्रश्न करण्याचे शहाणपण त्याच्यात दिसते आहे. नफातोट्याचे गणित मांडत असताना बाजाराची व्यवस्था बदलण्यासाठी आजचा तरुण शेतकरी सरसावलेला दिसतो. प्रसंगी आपल्या हक्कांसाठी आंदोलनाचे शस्त्र देखील उगारतना दिसतो हे बदल निश्चितच सकारात्मक आहेत.शास्त्र आणि शस्त्र ह्या दोन्हींच्या आधारे तरुण रक्ताचा बळीराजा आता कपाळाला हात लावून आभाळाकडे पाहत बसत नाही. आपल्या मनगटातील जोर आजमावून काळया मातीत घामाच्या सिंचनाने आजही मोती पिकविण्याचे सामर्थ्य त्याच्यात आहे. तो खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा आहे. योग्य मार्गदर्शन आणि मदतीच्या जोरावर स्वकष्टाने पुन्हा एकदा शेतीच उत्तम व्हावी, शेतकऱ्याच्या मुलांनाही चांगले शिक्षण आणि आरोग्याच्या सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात,त्याने पिकविलेल्या पिकाला योग्य बाजारभाव मिळून त्याच्या कष्टाचे चीज व्हावे,अंधश्रध्दा आणि कर्जबाजारी पणाचे सावट त्याच्या आयुष्यावर पडू नये ह्या आणि अशाच अनेक शुभेच्छा देऊन,मातीतून मोती पिकविणाऱ्या बळीराजा बद्दल शेतकरी दिनाच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करूया. पुन्हा एकदा मातीतून मोती पिकविणाऱ्या बळीराजाला शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *