मोठी बातमी - बागेमध्ये बैलांच्या जागी महिलांनाच जुंपले
News24सह्याद्री -
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास भाले यांच्या निवासस्थानी असलेल्या बागेमध्ये बैलांच्या जागी महिलांनाच जुंपले जात असल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे. या घृणास्पद प्रकारामुळे शेतकऱ्यांसाठी नवतंत्रज्ञान आणणाऱ्या विद्यापीठाच्या कुलगुरूंकडूनच शेतमजुरांची थट्टा करण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. विशेष म्हणजे, आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन असताना याच दिवशी मानवांना बैलांच्या जागी जुंपण्याचा हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे कुलगुरू डॉ. भाले आपल्या निवासस्थानी असलेल्या बागेची व्यवस्था चांगली राहावी यासाठी चक्क महिलांनाच अशाप्रकारे जनावरांची वागणूक देत आहेत. कृषी विद्यापीठात हजारो बैल, गायी यासोबतच ट्रॅक्टरची व्यवस्था असतानाही त्याचा उपयोग न करता महिलांकडून अशाप्रकारे कामे करवून घेण्यात कुलगुरूंचा नेमका काय हेतू असावा हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
No comments
Post a Comment