दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊ देत; जयंत पाटील यांचे आव्हान
मुंबई
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन आता राज्यात आगामी विधानसभा निवडणुका लढवल्यास भारतीय जनता पक्षाला पन्नासपेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पुण्यात केले. विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची ताकद दिसून आली आहे.
तीन पक्ष एकत्र येऊन लढल्यास भाजपाचे ५० आमदार सुद्धा निवडून येणार नाहीत असे म्हणणारे जयंत पाटील यांनी लक्षात ठेवायला हव की दगाबाजांबरोबर आघाडी करून सत्ता मिळवणाऱ्यांनी अशा वल्गना करायच्या नसतात, असा टोला भातखळकर यांनी लगावला. तसेच, ‘जयंतराव (पाटील), भाजपाच्या पराभवाबाबत इतके आश्वस्त राहू नका. इतकंच असेल तर उद्या विधानसभा बरखास्त करा आणि राज्यात निवडणुका घ्या. मग दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ देत असे आव्हानही त्यांनी राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांना दिले.

No comments
Post a Comment