मोठी बातमी - काँग्रेस कार्यकर्ते उद्या राज्यभर करणार आंदोलन
News24सह्याद्री -
काँग्रेसचे कार्यकर्ते उद्या गुरुवारी राज्यभर आंदोलन करणार आहे. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्या राज्यभरात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. तसे आदेश देखील सर्व जिल्हाध्यक्षांना देण्यात आले आहेत. सलग सात दिवस दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आंदोलक शेतकऱ्यांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न सध्या केंद्र सरकार करत आहे. परंतु त्यांना त्यात सातत्याने अपयश येत आहे. काल दिल्ली येथे पाच सदसिय समितीने आंदोलक शेतकऱ्यांसोबत बैठक घेतली मात्र तीही बैठक निष्फळ ठरली. आता पुन्हा एकदा उद्या केंद्रीय मंत्री आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहे. ह्या आंदोलनावर तोडगा निघत नसल्याने काँग्रेस आक्रमक झाली दिल्लीतील शेतकऱ्यांच्या पाठिंब्यार्थ उद्या राज्यभरात काँग्रेस आंदोलन करणार आहेत. राज्यातील प्रत्येक तालुक्यात हे आंदोलन होणार आहे.
No comments
Post a Comment