मोठी बातमी - नव्या विषाणूच्या आगमनाच्या पर्सवभूमीवर नगरमध्ये सापडले इंग्लडहून आलेले ११ जण
News24सह्याद्री -
इंग्लंडमध्ये कोरोना पाठोपाठ नव्या विषाणूचा आगमन झाल्याने भारतासह जगभरातील इतर देश धसतवले आहेत , अश्यातच नगर शहरात इंग्लडहून ११ जण आल्याची माहिती पुढे आली आहे. पाच वेगवेगळ्या कुटुंबातील हि ११ जण असल्याचं वृत्त आहे . या अकरा जणासह त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी केली जाणार आहे . तर या वृत्ताला पालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार व वैद्यकीय अधिकारी अनिल बोर्गे यांनी दुजोरा दिला आहे . मात्र हे अकरा जण नगर शहरातील वेगवेगळ्या भागातील आहेत त्यामुळे हि चिंतेची बाबा आहे . तर या पूर्वीही नगर शहरात बाहेरील देशातून आलेल्या नागरिकांनमुळेच कोरोना विषाणूचा प्रसार झाला होता. तर या नव्या विषाणूच्या आगमनामुळे धास्तावलेल्या प्रशासनाने भारतात २३ डिसेंबर पासून ब्रिटनमधून येणारी विमानसेवा बंद केली ,मात्र त्यापूर्वी आलेल्या प्रवाशांपैकी पाच करोना पॉझिटिव्ह रुग्णांनी विमानतळावरूनच पोबारा केल्याची घटना ताजी असतानाच नगर शहरात ११ जण इंग्लडहून आल्याची माहिती समोर आल्याने स्तहनिक प्रशासन सतर्क झाले आहे . .
No comments
Post a Comment