मोठी बातमी - नगर तालुक्यात जेऊर गावात आढळले बिबट्याचे अस्तित्व
News24सह्याद्री -
आत्ताची मोठी बातमी हाती येतेय बिबट्याचे वास्तव्य पुन्हा एकदा नगर शहरच्या जवळच आढळून आलय नगर तालुक्यातील जेऊर परीसरात बिबट्याचे वास्तव्य ग्रामस्थांना जाणवले असून या बाबत आता वन विभागाने सुद्धा दुजोरा दिलेला आहे. नगर जिल्ह्यात मागील काही दिवसांपूर्वी बिबट्याने पाथर्डी तालुक्यात धुमाकूळ घातला होता यात तीन बालकांचा मृत्यू जहाल होता तर काही शेतकरी गंभीर जखमी झाले होते वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात पाथर्डी तालुकायत चार बिबटे पकडले गेले होते तर नगर तालुक्यातील काही गावांमध्ये बिबट्याचे दर्शन झाले असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते तर आता नगर शहरच्या जवळच असणाऱ्या जेऊर गावाजवळ बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे वन विभागाने या भागात पिंजरा लावावा अशी मागणीही गर्मस्थानी केली आहे
No comments
Post a Comment