Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - 'येऊ कशी तशी मी नांदायला' ४ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला

No comments

  News24सह्याद्री 'येऊ कशी तशी मी नांदायला' ४ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला...पहा गॉसिप कल्ला




TOP HEADLINES

1. इरफान खानचा शेवटचा चित्रपट पुढच्या वर्षी होणार प्रदर्शित
दिवंगत अभिनेता इरफान खानने आपल्या दमदार अभिनय कौशल्याने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. इरफान खानचा शेवटचा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने सोशल मीडियावर याबद्दलची माहिती दिली आहे.  

2. 'येऊ कशी तशी मी नांदायला' ४ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला
गेल्या काही दिवसांपासून येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेच्या प्रोमोमुळे अनेकांना या मालिकेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही मालिका नेमकी कधी सुरु होणार हा एकच प्रश्न प्रेक्षकांना सतावत आहे. मात्र, या मालिकेसाठी प्रेक्षकांना आता फार काळ वाट पाहवी लागणार नाहीये.ही मालिका नव्या वर्षात म्हणजे ४ जानेवारी २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

3. नेटफ्लिक्सने आणली भन्नाट फिल्म
२०२०मध्ये हरवलेला आनंद पुन्हा परतेल व विस्कळीत आयुष्य पुन्हा एकदा सुरळीत होईल अशी अपेक्षा करत आहेत. मात्र येणारं नवं वर्ष जर माणसांच्या रुपात आपल्या समोर आलं तर काय होईल? वरकरणी ही कल्पना फारच विचित्र वाटतेय ना? परंतु नेटफ्लिक्स याच विचित्र कल्पनेवर एक नवी कोरी शॉट फिल्म घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  

4. ‘कुली नंबर 1’ ला IMDb वर मिळाली कमी रेटिंग
हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याला चांगलंच ट्रोल करण्यात आलं. यातच आयएमडीबी रेटिंगवरही तो सपशेल अपयशी ठरल्याचं दिसून येत आहे. या चित्रपटाला १० पैकी १.३ रेटिंग मिळालं आहे.  

5. मेगास्टार चिरंजीवीच्या मुलाला कोरोनाची लागण
‘माझ्या करोनाच्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मला कोणतीच लक्षणे नसून मी घरीच क्वारंटाइनमध्ये राहत आहे. लवकरच बरा होऊन परत येईन अशी आशा करतो’, असं ट्विट त्याने केलंय. त्याचसोबत गेल्या काही दिवसांमध्ये त्याच्या संपर्कात आलेल्यांना त्याने करोनाची चाचणी करून घेण्याचं आवाहन केलं आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *