Breaking News

1/breakingnews/recent

रजनीकांत यांची राजकारणातून माघार: कमल हसन ती पोकळी भरून काढणार?

No comments

 



मुंबई - 

रजनीकांत यांनी नवा पक्ष स्थापन न करण्याची घोषणा करून राजकीय मैदानातून माघार घेतली आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर गारूड निर्माण करणारे सुपरस्टार, ‘थलायवा’ रजनीकांत यांनी नवा पक्ष स्थापन न करण्याची घोषणा करून राजकारणातून माघार घेतली आहे. रजनीकांत यांच्या या निर्णयामुळे तामिळनाडूतील राजकीय समीकरणावरून नवनवे आडाखे बांधले जात असून रजनीकांत यांच्या या निर्णयाने मक्कल निधि मय्यम (एमएनएम) पक्षाचे नेते कमल हसन यांना फायदाच होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. रजनीकांत यांची माघार आणि करुणानिधी, जयललिता या ज्येष्ठ नेत्यांच्या निधनाने तामिळनाडूच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कमल हसन भरून काढतील, असं राजकीय निरीक्षकांच म्हणणे आहे. 

ही तर ‘श्रीं’ची इच्छा तामिळमध्ये लिहिलेल्या पत्रात रजनीकांत यांनी आपल्या पक्ष प्रवेश न करण्याची कारने दिली आहे. माझी तब्येत खालावली आहे. हा ईश्वराचा सूचक इशाराच मानतो. त्यामुळे मी राजकीय पक्ष स्थापन न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, लोकांनी त्यांना मी बळीचा बकरा बनवले असे समजू नये, असे रजनीकांत यांनी या पत्रात नमूद केले आहे. रजनीकांत यांना तामिळनाडूत थलायवा म्हणतात. तर कमल हसन यांना ‘उलंगा नायगन’ म्हणतात. ‘उलंगा नायगन’चा अर्थ ‘विश्वचा हीरो’ असा होतो. कमल हसन यांच्यावर डाव्या विचारसरणीचा प्रभाव आहे. त्यांची राजकीय समज पक्की असून तामिळनाडूतील राजकारणाचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे.

 शिवाय तामिळनाडूत पडद्यावरील ताऱ्यांना नेहमीच राजकारणात मोठे स्थान मिळालेल आहे. सध्या तामिळनाडूत इंडस्ट्रीतील एकही कलाकार नाही. त्यामुळे कमल हसन यांना या संधीचा फायदा मिळू शकतो. ते जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनाने निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढू शकतात, असे  राजकीय विश्लेषकांना वाटत. स्टॅलिन आणि रजनीकांत यांचा अपवाद वगळता तामिळनाडूत कमल हसन यांना कोणताही स्पर्धक नव्हता. त्यात रजनीकांत यांनी माघार घेतल्याने त्यांना थेट आता स्टॅलिन यांच्याशी सामना करावा लागणार आहे. तामिळनाडूत भाजपचा प्रभाव नाही. काँग्रेसही नावाला शिल्लक आहे. शिवाय कमल हसन नेहमीच प्रादेशिक अस्मितेच्या बाजूने उभे राहिल्याने त्यांना राजकीय प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *