Breaking News

1/breakingnews/recent

26 डिसेंबर Good Morning सह्याद्री

No comments

       News24सह्याद्री - पण मी कोल्हापूरला परत जाणार - चंद्रकांत पाटील...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट



TOP HEADLINES

1. मनसेच्या खळखट्याकनंतर अ‍ॅमेझॉनचे नमते
अ‌ॅमेझॉनकडून मनसेला तसे कळवण्यात आले आहे. मात्र, आता अ‌ॅमेझॉनने राज ठाकरे यांची माफीही मागावी, असा पवित्रा मनसैनिकांनी घेतला आहे. त्यामुळे आता अ‌ॅमेझॉनचे अधिकारी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांच्याकडे दिलगिरी व्यक्त करणार का, हे पाहावे लागेल.   

2. पण मी कोल्हापूरला परत जाणार - चंद्रकांत पाटील
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, पुणे असं आहे की, याठिकाणी प्रत्येकाला सेटल व्हावंसं वाटतं. पण देवेंद्रजी मी तुम्हाला सांगतो, मी कोल्हापूरला परत जाणार आहे. विशेषत: मला विरोधकांना ही गोष्ट सांगायची आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

3. यशोमती ठाकूर यांची पंतप्रधानांवर बोचरी टीका
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी दोन कोटी नागरिकांच्या सह्या या कायद्याविरोधात घेऊन राष्ट्रपतींना दिल्या तरीही यावर कोणीच बोलायला तयार नाही. आंदोलन करणार्‍यांना घाबरतात म्हणून पोलिसांना समोर करता असा टीकास्त्र सोडत त्यांनी भाजपवर आणि पंतप्रधानांवर टीका केली आहेय.

4. दोंडाईच्यातील चार सायकलीस्टची दोंडाईचा ते शेगाव वारी   
दोंडाईचाहून धुळे मार्गे शेगाव हे ३५० की मी अंतर हे तीन दिवसात पूर्ण करणार आहेत. या सायकल वारीला माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी वारीला हिरवा झेंडा दाखवला.

5. गंगापूरमध्ये बेकायदेशीर द्वार वितरण सुरु
महीण्याच्या सुरवातीला कार्यालयीन वेळेत धान्य दुकानदारांना धान्याच्या पुरवठा करून पन्नास किलो गहू व तांदूळाच्या गोण्या देण्याची मागणी तालुक्यातील दुकानदारांनी केली आहे. 

6. शहर वाहतुक शाखेतर्फे उल्हासनगरात विशेष मोहीम
उल्हासनगर शहरातील जनतेने वाहतुक नियमाचे पालन करावे,दुचाकी स्वारांचे रस्त्यावरील अपघातास आळा बसावा,वाहन चालविताना हेल्मेट परीधान करावे,दुचाकी कंपनीकडुन लावण्यातआलेल्या सायलेन्सर मध्ये माँडीफीकेशन करु नये.यासंदर्भात नागरिकांत जनजागृती होण्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

7. दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या आरोपीला सव्वा दोन वर्षाची कैद
विरोधात मुंबई कल्याण मधील विविध पोलीस ठाण्यात 14 गुन्हे दाखल आहे . या गुन्ह्यात चोरट्याकडून जप्त करण्यात आलेले दागिने तक्रारदारांनी ओळखल्यामुळे तपासाला मदत झाल्याचे उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले.

8. कोविड सेंटर मधील कर्मचाऱ्यांना तीन महिने पगारच नाही 
तसेच याबद्दल आमच्याकडे कोणतेही तक्रार आलेली नसल्याचे केडीएमसीचे अधिकारी डॉ. समीर सरवनकर यांच्याकडून सांगण्यात आले. दरम्यान यासर्व प्रकारचा ऑडिट करण्याची मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे

9. दगडाने ठेचून बालकाची हत्या
दगडाने ठेचून मारल्याचे आढळून आले. तपासाअंती त्याच्या मोठ्या भावाबरोबर खेळणाऱ्या १३ वर्षीय बालकाने झाडावरील बोरे तोडल्याच्या रागातून दगडाने ठेचून मारल्याचे समोर आले. त्या बालकास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

10. बॉक्सिंग डे कसोटीत भारतीय संघात चार बदल 
विराट कोहलीच्या जागी अष्टपैलू रवींद्र जाडेजाला संधी मिळाली आहे. तर पृथ्वी शॉऐवजी शुभमन गिलला स्थान देण्यात आहे. दुखापत झाल्याने मोहम्मद शमी मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे त्याच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळाली आहे. याशिवाय भारतीय संघाने रिद्धीमान साहाच्या जागी रिषभ पंतला परत बोलावलं आहे.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *