Breaking News

1/breakingnews/recent

24 डिसेंबर Good Morning सह्याद्री

No comments

     News24सह्याद्री - देशातल्या 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 18 हजार कोटी रुपये...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट




TOP HEADLINES


1. देशातल्या 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 18 हजार कोटी रुपये
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी देशातील 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी रुपये जमा करण्यात येतील.

2. मराठा समाजाला ईडब्लूएस आरक्षण
 या निर्णयाविरोधात आपली भूमिका ठरवण्यासाठी आज मराठा समाजाचे समन्वयक पुण्यात एकत्र येणार आहेत. यावेळी सरकारच्या या निर्णयाविरोधात भूमिका ठरवली जाईल.  

3. भरती प्रक्रियेवरुन ऊर्जा मंत्री चिडले
 डॉ. राऊत यांनी काल यासंबंधी बैठक घेतली.  यावेळी त्यांनी कंपनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. 

4. पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेला परवानगी नाकारली
 मात्र, पोलिसांनी सध्याच्या परिस्थितीत एल्गार परिषदेला परवानगी देता येणार नाही, असे सांगत हा अर्ज फेटाळून लावला आहे.

5. अनधिकृत गाळ्यांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई
गाळ्यांना अभय देणाऱ्या पालिकेच्या साहाय्यक आयुक्ताविरुद्ध कठोर कारवाई करावी, तसेच या संपूर्ण प्रकरणाची र्सवकष चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश स्थायी समितीने काल दिले. 

6. ठाकरे मुख्यमंत्री, तरी मराठीसाठी आम्हाला भांडावे लागते - आ. राजू पाटील
 मराठी साठी आम्हाला भांडावे लागत आहे. ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. मराठी नंबर प्लेटच्या गाडय़ा थांबविल्या जातात. याला कायदेशीर मान्यता द्यावी आणि अहंकाराने अभिमान वाढवावा, अशी घाणाघाती टिका मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यावर केली आहे.

7. उल्हासनगरची गजनंदिनी गिरासे ठरली 'मिस इंडिया'
 कोलकत्ता येथे नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धेत देशातील 14 हजार तरुणींनी भाग घेतला होता. त्यात गजनंदिनी उर्फ गौरी गिरासे हिने टँलेंन्ट, राँऊड,नॅशनल कॉसटूम,फिटनेस,डांन्स काँम्पिटीशन यात बाजी मारली "मिस इंडिया" चा सरताज पटकाविला 

8. लातूरमध्ये प्रस्थापिता विरुद्ध नव्यांचा  जोश  
 ग्रामपंच्यान्नतीसाठी कालपासून नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी सुरुवात झाली आहे . यामध्ये पॅनल प्रमुखाला मोठी कसरत करून पूर्ण पॅनल निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे 

9. जिल्हाधिकारी कार्यलयातील अधिकाऱ्याने मागितली एक हजाराची लाच 
त्यानुसार ती पंचासमक्ष स्वीकारताना त्यांना बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

10. सरकारी योजनांपासून सर्वसामान्य वंचित 
अधिकारी आणि सरपंचांनी मिळून या विहिरीचे काम हे जे सी बी च्या माध्यमातून करून स्वतःच्या खिशात पैसे घातल्याचा प्रकार समोर आलाय. या अश्या बोगसगिरी ने काम करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही व्हावी ही नागरिकांतून मागणी होत आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *