Breaking News

1/breakingnews/recent

23 डिसेंबर Good Morning सह्याद्री

No comments

    News24सह्याद्री - इलेक्टोरल बॉन्डशी संबंधित माहिती गोपनीय- केंद्रीय माहिती आयोग...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट




TOP HEADLINES


1. विधानपरिषद नामनियुक्त आमदारांबाबत याचिका; केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश
यामध्ये राज्यपाल आणि मंत्रिमंडळाला महत्त्वाचे अधिकार आहेत, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांकडून हायकोर्टात करण्यात आला. याबाबत आता अॅटर्नी जनरलना न्यायालयाने नोटीस बजावली आहे.

2. इलेक्टोरल बॉन्डशी संबंधित माहिती गोपनीय- केंद्रीय माहिती आयोग
राजकीय पक्षांना इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून कोणी आणि किती पैसे दिलेत त्यांची नावे जाहीर करावी अशी केंद्रीय माहिती आयोगाकडे एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आयोगानं हे मत व्यक्त केलंय.  

3. राज्यात होणार महागुंतवणूक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत ६१ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. त्यातून २ लाख ५३ हजार ८८० लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

4. राज्य सरकार तरुणांना 10 लाखांपर्यंत अर्थसाहाय्य करणार - नवाब मलिक 
राज्यातील अशा होतकरु तरुणांच्या नवनवीन संकल्पनांवर आधारीत स्टार्टअप्सना पेटंट मिळविण्यासाठी अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे अशी घोषणा कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली  

5. खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांचा अंबरनाथ येथील शिवमंदिराचा पाहणी दौरा
श्रीकांत शिंदे यांनी भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत शिवमंदिर आणि परिसराला भेट देत पाहणी दौरा केला. तसेच प्राचीन शिवमंदिराला भेट देणाऱ्या लाखो भाविकांच्या दृष्टिने सोयी-सुविधां संदर्भात महत्वपूर्ण सूचना यावेळी त्यांनी  केल्या.

6. सर्व पक्ष विकास समितीचा बहिष्कार यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचाही पुढाकार 
 याच पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने देखील पिंपरी गावात स्वतंत्र बैठक घेत सर्व पक्षीय विकास समितीला पाठींबा दिला आहे. तर शिवसेना काही पदाधिकारी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असलातरी त्याला आमचा जाहीर विरोध आहे असे राष्ट्रवादीचे जीवन वालिलकर यांनी सांगितले.

7. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक 
उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती व नगरपंचायती वर भगवा फडकवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. तसेच या वेळी मी बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतला 5 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली.

8. वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी पोलीस अधीक्षक स्वतः रस्त्यावर उतरले 
शहरात कसल्याही प्रकारची वाहतूक कोंडी होनार नाही यासाठी आम्ही मास्टर प्लॅन तयार करून शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करू असे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सांगितले

9. अकोला महानगरपालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी - जिल्हाधिकारी पापळकर  
 शासकीय तसेच खाजगी अब्युलन्स सेवा, मेडिकल्स , रात्रीच्या वेळेस सुरु राहणारे पेट्रोलपंप, भाजीपाला विक्री, दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या डेअरी, रेल्वेने तसेच एस.टी बस व खाजगी वाहनाने उतारणाऱ्या प्रवाशाकरीता ॲटोरिक्षा यांना संचार बंदीचे कालावधीमध्ये मुभा राहील असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

10. गणपती मंदीर ते तीनकोणी चौक रस्त्याच्या प्रवेशद्वाराचे उदघाटन  
 गंगापूर शहराच्या विकासामध्ये खारीचा वाटा असून त्यांनी विविध विकासात्मक मोठ मोठेकामे केले असल्याने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत असे प्रतिपादन नगरसेवक प्रदीप पाटील यांनी केले 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *