क्राईम अलर्ट - सांकेतिक भाषेचा वापर केला अन् आरोपी पोलिसांच्या जाळ्यात आले! काय होती ही भाषा?
News24सह्याद्री -
नगरमध्ये गाजलेल्या आणि तमाम महिला वर्गामध्ये दशहत निर्माण करणार्या रेखा जरे हत्याकांडातील आरोपी पोलिसांनी अवघ्या १८ तासात पकडले. पकडलेले आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. काही आरोपींना पोलिसांनी आज ताब्यात घेतलंय! या हत्याकांडाच्या मुख्य सुत्रधारापर्यंत पोलिस पोहोचलेत! पोलिस अधीक्षक मनोज पाटील आणि टीमचं जिल्हाभरात कौतुक होत आहे. दरम्यान पोलिसांनी घटना घडल्याच्या क्षणापासून अत्यंत धूर्तपणे तपास यंत्रणा हलवली. ही यंत्रणा कशी हलली याची माहिती आपण घेणार आहोतच! मात्र, त्या जोडीने या यंत्रणेने आरोपींची नावे सांकेतिक भाषेत ठेवल्याची बाब समोर आलीय! संपूर्ण तपासात पोलिस अधिकारी कर्मचारी हे आरोपींची नावे त्यांच्या संभाषणात घेत नव्हते. तर आरोपींची नावे मोठा भाऊ, छोटा भाऊ, लहान भाऊ अन् भावाची पोरं अशी सांकेतिक ठेवली गेली होती. ही सांकेतिक भाषा काय होती आणि हे मोठा भाऊ, छोटा भाऊ, लहान भाऊ नक्की कोण हे आपण समजून घेणार आहोत
No comments
Post a Comment