31 डिसेंबर सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - राम शिंदेंच्या आरोपांना रोहित पवारांचे प्रत्युत्तर...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. अहिल्यापूर येथील रथ शोभायात्रा
दिक्षार्थी चेतन कुमार चोरडिया , विनय बागरेचा हे मालेगाव शहरात फेब्रुवारी महिन्यात जैन भगवती दिक्षा ग्रहण करणार असल्याचे समाजबांधवांनी सांगितले.
2. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाकडून अजून एकास अटक
३० डिसेंबर २०२० रोजी कांदिवली मुंबई येथून अटक करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने योगेश कनोडिया यांना दि. १३ जानेवारी, २०२१ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
3. भाववाढ द्या अन्यथा ऊसतोड बंद आंदोलन करू
तालुका अध्यक्ष शरद पवार यांनी वृद्धेश्वर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जालिंदर पवार यांना लेखी निवेदन दिले आहे
4. अजित पवार-देवेंद्र फडणवीस पुण्यात एकाच मंचावर
पुणेकरांना यानिमित्त अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची राजकीय टोलेबाजी पाहायला मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवशेनात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली होती.
5. राम शिंदेंच्या आरोपांना रोहित पवारांचे प्रत्युत्तर
आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. गटतट गावात नसावेत, असा माझा प्रामाणिक उद्देश आहे. पण त्यांचा उद्देश गटतट असावेत असा असल्याचे प्रत्युत्तर रोहित पवारांनी शिंदे यांना दिले आहे.
6. स्पर्धा परीक्षांच्या कमाल संधी ‘एमपीएससी’कडून निश्चित
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निर्णयावर विद्यार्थ्यांच्या काय प्रतिक्रिया येतात ते पाहण्यासारखे असणार आहे. तसेच एखाद्या उमेदवारानं पूर्व परीक्षेला अर्ज केला आणि परीक्षेला बसला तर त्याचा अटेम्प्ट मोजला जाणार आहे. पूर्व परीक्षेनेंतर पुढील कोणत्याही टप्प्यावर उमेदवार अपात्र ठरल्यास त्याचा अटेम्प्ट गणला जाणार आहे.
7. नव्या वर्षांत १५० ई-बसची पुणेकरांना भेट
नव्याने गाडय़ात प्राप्त होणार असल्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांना उच्च दर्जाची सुविधा मिळेल, असा दावा पीएमपीकडून करण्यात आला आहे.
8. वाहतूक पोलिस पथकाने वसूल केले सव्वा कोटी
कल्याण-विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग सह पांढरीचापूल नेवासा शेवगाव या महामार्गावरील रस्त्यांवर वाहतुकीचे नियम न पाळणार्या तेवीस हजार चारशे 87 वाहनावर धडक कारवाई करत त्यांच्याकडून एक कोटी 19 लाख 29 हजार सहाशे रुपयांचा दंड वाहतूक पोलीस पथकाकडून वसूल करण्यात आला आहे
9. मराठी रंगभूमीच्या वैभवाला साजेसे भव्य कलादालन साकारा- उद्धव ठाकरे
गिरगाव चौपाटी येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या पुनर्रचना प्रकल्पांतर्गत मराठी रंगभूमीचे कलादालन उभं करण्यात येणार आहे. या कलादालनाचे सादरीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज करण्यात आलं. यावेळी ते बोलतं होते.
10. नाशिक विभागीय माहिती कार्यालयाचे नव्या जागेत स्थलांतर
नाशिक रोड नाशिक येथे कार्यरत होते हे कार्यालय मीडिया सेंटर बिल्डींग भालेकर मैदान महाकवी कालिदास कलामंदिर समोरील महापालिकेच्या जागेत स्थलांतर झाले आहे तसेच एक जानेवारी 2019 पासून विभागीय माहिती कार्यालयाचे कामकाज सुरू होणार असल्याची माहिती उपसंचालक रणजितसिंह राजपूत यांनी दिली आहे
No comments
Post a Comment