Breaking News

1/breakingnews/recent

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे पॉझिटिव्ह

No comments




मुंबई -

एकनाथ खडसे सध्या मुंबईत आहेत. त्यांना ईडीने नोटीस बजावून 30 डिसेंबर रोजी चौकशीसाठी बोलवले होते. मात्र, एकनाथ खडसे यांनी कालच ईडीला विनंती पत्र लिहिले. कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्याने चौकशीसाठी 14 दिवसांची मुभा मिळावी, असे एकनाथ खडसे यांनी पत्रात म्हटले होते. एकनाथ खडसे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी ताप, सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी आपली कोरोना चाचणी  केली होती. ती पॉझिटिव्ह आली आहे. मात्र, एकनाथ खडसे यांच्याकडून अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळू शकला नाही. गेल्या महिन्यातही एकनाथ खडसे यांनी कोरोनाची लागण झाली होती. एकनाथ खडसे यांनी पत्रात म्हटले आहे की, ईडीच्या मुंबईतील कार्यालयात उपस्थित होण्यासाठी समन्स प्राप्त झाले आहे.

 त्यासाठी मी मुंबईलाही पोहोचले आहे वैद्यकीय तपासणीअंती कोरोना सदृश्य लक्षणे असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोनाची चाचणी घेतली. आता तोच रिपार्ट पॉझिटिव्ह आल्याच समोर आले आहे. प्रकृती बरी झाल्यानंतर सक्तवसुली संचालनालयास पूर्ण सहकार्य करणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. एकनाथ खडसे यांना पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील एका भूखंडाच्या खरेदी प्रकरणी ईडी चौकशीची नोटीस बजावली आहे. दरम्यान, याआधी देखील याच प्रकरणी एकनाथ खडसे यांची चौकशी झाली होती आणि याचं भूखंडावरून त्यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. आता याच प्रकरणी एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुणे आणि नाशिक येथील अॅन्टिकप्शन ब्युरोकडून पाच वर्षांत चौकशी करण्यात आली होती. तसंच झोटिंग समिती आणि आयकर विभागाने देखील चौकशी केली होती. आता या प्रकरणाची ईडी चौकशी करणार आहे


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *