Breaking News

1/breakingnews/recent

सरकार स्थिर राहावे असे वाटत असेल तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावे : यशोमती ठाकूर

No comments

 News24सह्याद्री -



मुंबई - 

राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सातत्याचा अभाव दिसतो, असे शरद पवार म्हणाले होते. या केलेल्या टीकेमुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याची चर्चा होती. पण आता महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांच्या ट्विटमुळे काँग्रेसची नाराजी उघड झाली आहे.

यशोमती ठाकूर ट्विट करत म्हटल्या आहे की, 'आघाडीमधील नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आल्या आहेत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून मला महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की हे सरकार स्थिर राहावे असे वाटत असेल तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावे. आघाडी धर्माचे पालन करावे', असा ठाकूर यांनी सूचक इशारा दिला आहे. तसेच, काँग्रेस नेतृत्वाची पाठराखण करणारे आणखी एक ट्विट त्यांनी केले आहे. 'काँग्रेसचं नेतृत्व अतिशय स्थिर आहे. निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे', असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *