शिवसैनिक आक्रमक, (ईडी) कार्यालयासमोर भाजप प्रदेश कार्यालयाचे बोर्ड लावले
मुंबई -
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले. अॅक्शन मोडमध्ये आले आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबईतील अंमलबजावणी संचनालयाच्या कार्यालयासमोर ‘भाजप प्रदेश कार्यालय’ असे बॅनर लावले. संजय राऊत यांनी पत्नीला आलेल्या नोटिसीवर प्रतिक्रिया देताना ‘ईडी हा भाजपचा पोपट’ असल्याचा घणाघात केला आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप हा सामना आता आणखी रंगतदार होणार आहे. आपण सगळे कालपासून खासकरुन मीडिया एक प्रश्न विचारत आहे. ईडीच्या नोटीसच काय झाले? आपण मला घरी भेटलात, ‘सामना’त भेटलात, शिवसेना कार्यालयात भेटलात, मी नेहमी तुमच्याशी बोलत असतो. आमच्यासाठी ईडी हा महत्त्वाचा विषय नाही.
सीबीआय, ईडी किंवा इन्कम टॅक्स असेल, कधी काळी या तिन्ही संस्थांना देशात प्रतिष्ठा होती. एखाद्या गुन्ह्या संदर्भात सीबीआय, ईडी, आयकर विभागाने कारवाई करायची म्हटले, तर त्यामध्ये काहीतरी गांभीर्य आहे असे वाटत होते. पण गेल्या काही वर्षापासून ईडीची नोटीस येणे, कारवाई करणे म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाने आपली भडास काढणे असे लोकांनी गृहित धरले आहे. सत्तेतील राजकीय पक्षाला, केंद्रातल्या किंवा राजकीय विरोधकांना राजकीय दृष्ट्या संपवता येत नाही. त्यामुळे ईडी, सीबीआय सारखे हत्यारे वापरावी लागतात.असा घणाघात संजय राऊत यांनी केला होता.

No comments
Post a Comment