धनंजय मुंडेंचा बहिणीला सल्ला 'ताई काळजी घे'
ज्येष्ठ राष्ट्रवादी नेते आणि कॅबिनेट मिनिस्टर धनंजय मुंडे यांनी आपल्या बहिणीसाठी भावनिक पोस्ट लिहिली आहे.त्यात त्यांनी बहिणीचे सांत्वन केले आहे . पंकजा मुंडेंना सर्दी असून ताप आहे त्यामुळे त्यांनी स्वतःला आयसोलेट केलं आहे. पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला आव्हान करते की आपण शिरिषजी बोराळकर यांना पहिल्या पसंदी चे मत देऊन विजयी करावे .मला सर्दी खोकला व ताप आहे त्यामुळे मी जवाबदारी स्वीकारून isolate झाले आहे. अर्थाचे अनर्थ करणाऱ्याकडे दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी.धनंजय मुंडे यांनी म्हटलंय की पंकजाताई मी स्वतः कोरोना विषाणूचा त्रास सहन केला आहे, तो त्रास तुझ्या वाट्याला येऊ नये कोरोनाविषयक सर्व चाचण्या करून घे स्वतःची व घरच्यांची काळजी घे. तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो. मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे.

No comments
Post a Comment