Breaking News

1/breakingnews/recent

सुप्रिया सुळे यांना प्रितम मुंडेंचं जशास तसं उत्तर

No comments



मुंबई -

खासदार प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या तथा खा. सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. मोदी सरकारने शेतकऱ्यांना न्याय तर दिलाच आहे मात्र त्याच बरोबर पैसा, त्यांच्या उत्पादनाला हमीभाव आणि शेतकऱ्यांची सुरक्षा देण्यात मोदी सरकार यशस्वी ठरले आहे. भाजपचे आज (शुक्रवार) राज्यभर शेतकरी संवाद अभियान सुरु आहे. या अभियानाअंतर्गत भाजपचे विविध नेते राज्यभर तसेच देशभरात कार्यक्रम घेऊन कृषी कायद्यांचे  महत्त्व पटवून देत आहेत. 

बीडमधल्या संवाद अभियानामध्ये सहभागी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रीतम मुंडे यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला. पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांच्या खात्यात आज पैसे वर्ग केल्यानंतर खा. सुप्रिया सुळे यांनी पैसा नको शेतकऱ्यांना न्याय हवा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. सुप्रिया सुळे यांच्या याच वक्तव्यावर बोलताना प्रीतम मुंडेंनी त्यांचा समाचार घेतला.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *