तुम्ही जाणते राजे नसून विश्वासघातकी राजे आहात - सदाभाऊ खोत
मुंबई -
देशात सध्या शेतकरी आंदोलन हा मुद्दा राजकारणत जास्तच तापला असून आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. विरोधकांना उत्तर देण्यासाठी भाजपाने राज्यभरात संवाद यात्रेच आयोजन केले आहे. दुसरीकडे नरेंद्र मोदींनी देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा केले.कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ रयत क्रांती संघटना आणि भारतीय जनता किसान मोर्चा तर्फे आयोजित किसान आत्मनिर्भर यात्रा काढण्यात आली आहे. यानिमित्ताने रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
मार्केट कमिटीत मालाच्या विक्रीसंदर्भात विरोध करतात, मात्र हेच शरद पवार दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतात अशी टीका त्यांनी केली आहे. शरद पवारांच मनावर घेऊ नका. ते नेहमी उलट बोलतात. जेव्हा ते बोलतात सूर्य इकडून उगवेल तेव्हा नेमका दुसऱ्या बाजूने उगवत असतो. शरद पवार यांनी आत्मचरित्रातही तसे लिहून ठेवले आहे शरद पवार तुम्ही जास्त खोटे बोलू नका नाहीतर इतिहास लिहिला जाईल की, तुम्ही जाणते राजे नसून विश्वासघातकी राजे होऊन गेलात असे टीकास्त्रही त्यांनी सोडले. २७ डिसेंबरपर्यंत ही यात्रा चालणार असून इस्लामपूर येथे जाहीर सभेने सांगता होणार आहे.

No comments
Post a Comment