Breaking News

1/breakingnews/recent

चंद्रकांत पाटलांनी हिमालयात जायला हवे - अब्दुल सत्तार

No comments


मुंबई -

 महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले भाजपात प्रवेश केला असता तर ती माझी राजकीय आत्महत्या ठरली असती  शिवसेना प्रवेशाचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी समर्थन केले आहे. राजकीय आयुष्यात अनेक राजकीय निर्णय चुकत असतात, तसाच माझा हा निर्णय चुकला असता तर ही माझी राजकीय आत्महत्या ठरली असती, असंसुद्धा अब्दुल सत्तार यांनी अधोरेखित केलेय. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवरही निशाणा साधला होता. चंद्रकांतदादा हिमालयात गेल्यास आम्ही तिकडे त्यांची व्यवस्था करू. इतकेच नव्हे तर मोदी साहेबांनाही हिमालयाची खूप माहिती आहे.

 त्यामुळे आता चंद्रकांतदादांनी खरंच हिमालयात जायला हवे, असे अब्दुल सत्तार म्हणाले. चंद्रकांतदादा यांनी कोल्हापूर ऐवजी पुण्यातील कोथरुडमधून विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढली होती. मात्र, तो विषय त्यांच्यासाठी नेहमीच अडचणीचा ठरला आहे. विरोधकांकडून या मुद्द्यावर चंद्रकांत पाटलांना सातत्याने टोमणे मारले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं होतं. मी आताही कोल्हापुरातून निवडणूक लढवायला तयार आहे. मी जर कोल्हापूरमधून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.



 




No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *