एकनाथ खडसे यांची 'ईडी'ला विनंती , चौकशीपूर्वी मागितली 14 दिवसांची मुदत
मुंबई -
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठवल्यानंतर खळबळ उडाली आहे. आता याबाबत नवी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, एकनाथ खडसे यांनी ईडीला विनंती पत्र लिहिले आहे. कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्याने चौकशीसाठी 14 दिवसांची मुदत मिळावी, एकनाथ खडसे यांनी ईडीला दिलेल्या पत्रात म्हटले आहे. एकनाथ खडसे यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की मुंबईतील कार्यालयात उपस्थित होण्यासाठी समन्स प्राप्त झाले आहे. त्यासाठी मी मुंबईलाही पोहोचले आहे.
मात्र, 28 डिसेंबरला आपल्याला ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास सौम्य प्रमाणात जाणवला. वैद्यकीय तपासणीअंती कोरोना सदृश्य लक्षणे असल्याचे वैदयकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोनाची चाचणी घेतली. रिपोर्ट अद्याप यायचा आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार 14 दिवस विश्रांती आवश्यक असल्याचे सांगितले आहे. याबाबत ED कार्यालयाने 14 दिवसांनंतर चौकशीसाठी हजर होण्याबाबत संमती दिल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे.

No comments
Post a Comment