आमचे अजितदादा तर त्याहूनही वर निघाले: फडणवीस भरसभेत संतापले
मुंबई -
दिल्लीच्या वेशीवर गेल्या एक महिन्यापासून शेतकरी आंदोलन सुरु असताना भाजपाकडून संवाद यात्रेच आयोजन करण्यात आले.माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नव्या कृषी कायद्यांवरुन मोदी सरकारची बाजू मांडताना ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यानिमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील मांजरी बुद्रूक येथे संवाद यात्रेत संबोधित करताना नव्या कृषी कायद्यांचे फायदे सांगितले. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.
सरकारमध्ये शेतकऱ्यासंदर्भात बोलणारं कोणी नाही. शेतकऱ्याचा विचार कऱणारे कोणी नाही. पाच वर्ष सातत्याने आम्ही शेतकऱ्यांसाठी निर्णय़ घेतले. अतिवृष्टी, दुष्काळ, पीक रोग प्रत्येकासाठी आम्ही पैसा दिला. शेतकऱ्यावर जेव्हा कधी संकट आले तेव्हा आम्ही त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहिलो. पण आज सरकार शेतकऱ्यांकडे ढुंकून पहायला तयार नाही. शेतकऱ्याचा साधा विचारही केला जात नाही अशी टीका फडणवीसांनी यावेळी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठ्या घोषणा करत शेतकऱ्याच्या बांधावर गेले होते. तिथे जाऊन शेतकऱ्याचं नुकसान होतेय आणि कमी पैसे देताय असे सांगत ५० हजार रुपये हेक्टरी मदत मिळाली पाहिजे असे जाहीर केले. कोरवाहू आहेत त्यांना २५ हजार रुपये हेक्टरी मदत द्यायच सांगितले. आमचे अजितदादा तर त्याहूनही वर निघाले. म्हणाले उद्धव ठाकरे तुम्ही ५० हजार म्हणत बागायतदारांना दीड लाख रुपये मदत मिळाली पाहिजे. शेतकऱ्याचे कैवारी असल्याच आम्हाला वाटले. पण कसले दीड लाख आणि ५० हजार रुपये राजा उदार नाही तर उधार झाला आणि हाती भोपळा आला अशी परिस्थिती आहे.

No comments
Post a Comment