इतिहासात प्रथमच बेळगावमधील यल्लमा देवीची यात्रा रद्द
मुंबई -
इतिहासात प्रथमच बेळगावमधील यल्लमा देवीची यात्रा रद्ददिवाळी पाडव्याच्या दिवशी संपूर्ण राज्यभरातील मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आली . मात्र सौंदत्ती इथल्या श्री यल्लमा देवीचे मंदिर 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार असल्याचा आदेश बेळगावचे जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी जारी केला आहे. बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशामुळे यावर्षीची श्री यल्लमा देवीची 30 डिसेंबर रोजी होणारी पहिली पौर्णिमा यात्रा रद्द झाली आहे. इतिहासात प्रथमच सौंदत्ती श्री यल्लमा देवीची यात्रा रद्द झाली आहे.कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचे आराध्य दैवता असलेल्या सौंदत्ती इथले यल्लमा देवीचे मंदिर गेल्या नऊ महिन्यांपासून बंद आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी देवीचे मंदिर 30 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

No comments
Post a Comment