Breaking News

1/breakingnews/recent

दरेकर यांची निकालावर प्रतिक्रिया; महाविकास आघाडीवर साधला निशाणा

No comments


मुंबई -

धुळे-नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपच्या अमरीश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. निवडणुकीचा निकाल हा महाविकास आघाडीतील विसंवाद आणि मतभेदांचा स्फोट आहे. हेच चित्र उर्वरित निकालांतही दिसेल असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. अमरीश पटेल यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांचा २३४ मतांनी पराभव केला आहे. महाविकास आघाडीकडे २१३ मतं असताना पाटील यांना केवळ ९८ मते मिळाली. आघाडीच्या लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात 'क्रॉस वोटिंग' केल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. 

दरेकर यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.महाविकास आघाडीमध्ये सगळे काही आलबेल आहे, असे त्यांचे नेते वारंवार सांगतात. 'महाविकास आघाडीकडे २१३ एकत्रित मते होती. काँग्रेसकडे १५७ मत होती. शिवसेनेकडे २० होती. राष्ट्रवादीकडे ३६ मत होती. असे असताना आघाडीच्या उमेदवाराला केवळ ९८ मत मिळाली. याचा अर्थ काय? असा प्रश्न दरेकर यांनी केला. 'काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनीही आपल्या उमेदवाराला मतदान केले नाही. आघाडीतील इतर लोकप्रतिनिधी देखील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या मागे ठामपणे राहिले नाहीत. त्यांनी अमरीश पटेल यांना मतदान केले. आम्ही आघाडीचा आदेश मानत नाही हेच त्यांनी दाखवून दिले. उद्याच्या राजकारणाची दिशा काय असेल? महाविकास आघाडीचे भविष्य काय असेल हे सांगणारा हा निकाल आहे आणि ही सुरुवात आहे,

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *