Breaking News

1/breakingnews/recent

शिवसेनेला भोपळा मिळाला, निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा फायदा झाला : चंद्रकांत पाटील

No comments


मुंबई -

या निवडणुकीत फायदा कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा झालाय, शिवसेनेला भोपळा मिळाला. मित्रपक्ष सोबत नव्हता हे खरं आहे. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. या निवडणुकीत भाजपच्या गडांना चांगलाच हादरा बसलाय. यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, तिन्ही पक्ष एकत्रित लढल्याने त्यांना विजय मिळाला आणि हे स्वाभाविक होतं. माझे त्यांना नेहमी आव्हान राहील की त्यांनी एकटे लढून दाखवा. मात्र ते एकटे लढणार नाहीत त्यांच्यात तेवढी हिंमत नाही.पण मित्राला सोबत राहायचे नसेल तर त्याला आपण काय करणार. कितीही अंतर्गत कुरघोड्या केल्या तरी मित्रपक्ष सोबत असला तर फायदाच होतो. आता आम्ही चिंतन, मनन, परीक्षण, कार्यवाही सगळे करु. आता आम्हालाच ताकद वाढवावी लागेल असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *