आघाडीतील सर्व पक्षांच्या एकजूटीचा हा विजय - अजित पवार
मुंबई -
महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत भाजपाला मोठा फटका बसला आहे. नागपूर, पुणे, औरंगाबाद या भाजपाच्या प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. नेहमी भाजपाला साथ देणाऱ्या पुणेकर मतदारांनी यंदा मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयी केले. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड हे ४९ हजार मताधिक्याने विजयी झाले. तर औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतिश चव्हाण ५८ हजार मताधिक्याने विजयी झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय हा आघाडीतील सर्व पक्षांच्या एकजूटीचा विजय मिळवला आहे.
राज्यातील जनतेचा सरकारवरील विश्वास असल्याचे हे प्रतिक आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी केल्याबद्दल सर्व मतदारांचे आभार! महाविकास आघाडीचे अन्य उमेदवारही आघाडीवर असून त्यांचा विजय लवकरच जाहीर होईल अशा भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या असूनया विजयानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली. हा लोकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आहे. या यशासाठी अहोरात्र कष्ट करणारे कार्यकर्ते, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी कष्ट घेतले आहे. सर्वांच्या सुनियोजित अशा संघटीत प्रयत्नातून हा विजय साकारला आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहे.

No comments
Post a Comment