बँकांना तीन दिवस सुट्टी
मुंबई -
ख्रिसमसच्या आठवड्यात सलग तीन दिवस बँका बंद राहणार असल्यामुळे प्रत्यक्ष बँकेत जाऊन करायची कामे ग्राहकांना येत्या गुरुवारपर्यंतच उरकून घ्यावी लागतील. शुक्रवार 25 डिसेंबरला नाताळनिमित्त बँकांना सुट्टी असेल. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते. ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी येणारा शनिवार हा ‘फोर्थ सॅटर्डे’ आहे. त्यामुळेच 26 डिसेंबरलाही बँका बंद असतील. तर 27 डिसेंबरला रविवारच्या साप्ताहिक सुट्टीमुळे बँका उघडणार नाहीत. अशाप्रकारे या आठवड्यात सलग तीन दिवस बँकांना सुट्टी असेल.ग्राहकांना आपले कामे लवकर उरकून घ्यावी लागतील तीन दिवस सलग बँकांना सुट्टी असणार आहे रविवार चौथा शनिवार ख्रिसमस अश्या तीन दिवस बँकांना सुट्टी आहे

No comments
Post a Comment