शरद पवारांचे मोठे विधान सुप्रिया; सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार का?
राजकीय वर्तुळात सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच चर्चा सुरू झाली होती भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्या समोरच मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी, असे विधान केले होते. परंतु त्यानंतर शेलार यांनी ते वक्तव्य राजकीय नसून पुस्तकातील संदर्भाशी निगडीत असल्याचे म्हटले आहे . परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेबाबत मोठे विधान केले असून. सुप्रिया सुळे यांना राज्यातील राजकारणास रस नसून त्यांना केंद्रातील राजकारणात रस असल्याच शरद पवार यांनी सांगितले आहे.शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदाबाबतची चर्चा फेटाळून लावली. सुप्रिया सुळे यांना देशपातळीवर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे. त्यांना देशपातळीवरच काम करण्याची आवड आहे. प्रत्येकाची एक आवड असते. त्यांची आवड देशपातळीवरील कामात आहे असे शरद पवार म्हणाले होते.

No comments
Post a Comment