Breaking News

1/breakingnews/recent

अमिताभ कांत यांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे भडकल्या

No comments



मुंबई 

निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत म्हणाले की भारतात अतिलोकशाहीमुळे कठोर सुधारणा करणं कठीण असल्याचं वक्तव्य त्यांनी केले आहे.  कठोर सुधारणांशिवाय चीनशी स्पर्धा करणे सोपे नाही असेही ते म्हणाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमिताभ कांत यांच्या वक्तव्याचा निषेध केला असून.अतिशय बेजबाबदार विधान असल्याच म्हणाल्या आहे.  भारतात लोकशाहीचे कौतुक जास्त होतय, हे वरीष्ठ पातळीवरील प्रशासकीय अधिकाऱ्याचे विधान धक्कादायक आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही व्यवस्थेत हे अतिशय बेजबाबदार विधान आहे. त्याचा तीव्र निषेध. 

भारतातील लोकशाही व्यवस्थेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. भारतात अतिलोकशाहीमुळे कठोर सुधारणा करणे कठीण आहे. देशाला स्पर्धात्मक करण्यासाठी आणखी सुधारणांची आवश्यकता आहे,अशा सुधारणांसाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असते. परंतु भारतात अतिलोकशाहीमुळे कठोर सुधारणा करण अवघड जात. त्या करण्याची इच्छाशक्ती या सरकारने दर्शवली आहे, असे कांत यांनी सांगितले. केंद्र सरकार सर्वच क्षेत्रांत कठोर सुधारणा करीत असल्याचे कांत यांनी प्रथमच ‘स्वराज्य’ नियतकालिकाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितले. ते म्हणाले की खणिकर्म, कोळसा, कामगार, कृषीसह जवळजवळ सर्वच क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यात येत आहे, परंतु त्या राबवणे कठीण जात आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *