Breaking News

1/breakingnews/recent

वर्षा राऊत यांना ईडी कडून पाठवलेल्या नोटीसवर आदित्य ठाकरे यांचा संताप; म्हणाले…

No comments




मुंबई -

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना (ईडी)  कडून पाठवलेल्या नोटीसवर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आदित्य ठाकरेनी आपला संतापही व्यक्त केला. वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवून २९ डिसेंबरला चौकशीसाठी बोलावलं आहे. पीएमसी गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. ईडीची कारवाई राजकीय हेतूने प्ररित असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. “हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित आहे. 

पण महत्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडी अशा कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही. आम्ही राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत,” असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या खात्यात काही व्यवहार झाले. त्याबाबतचा तपशील जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना नोटीस पाठवली आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *