Breaking News

1/breakingnews/recent

माझ्या आयुष्यातील शेवटच आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी - अण्णा हजारे

No comments


मुंबई -

दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून केंद्राच्या कृषी कायद्या विरोधात शेतकरी गेल्या महिनाभरापासून आंदोलन करत आहे. केंद्राने कृषी कायदे मागे घ्यावेत अशी शेतकऱ्यांची ठाम मागणी आहे. त्यानंतर आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.आंदोलनासाठी ते दिल्लीतीली जंतर मंतर मैदानात आंदोलन करण्यासाठी अण्णा हजारे यांनी परवानगी मागितली असून जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते आंदोलन करणार आहे. 

अण्णांचे आंदोलन दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ असणार आहे. अण्णा हजारे यांनी आपले शेवटेचे आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी असेल असेही ते म्हटले आहे. केंद्र सरकारने यापूर्वी दोन वेळा लेखी आश्वासन देऊनही ते पाळले नाही. केंद्र सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाने प्रश्न सुटले नाहीत. तर दिल्लीत माझ्या आयुष्यातील शेवटचं आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी करेल. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.अण्णा हजारे यांनी आंदोलनात सहभागी होऊ नये यासाठी भाजपचे नेते हरिभाऊ बागडे, गिरीश महाजन यांनी अण्णांची भेटही घेतली होती.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *