भाजपाकडून होणाऱ्या टीकेवर आदित्य ठाकरेंनी अखेर सोडलं मौन
मुंबई -
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपाकडून होणाऱ्या आरोपावर अखेर मौन सोडले असून उत्तर दिले आदित्य ठाकरे म्हणाले. भाजपाला माझ्यापासून भीती वाटत असल्यानेच वैयक्तिक हल्ला करत आहे. गेल्या एक वर्षात तुम्ही विरोधकांच्या निशाण्यावर होतात, अनेक आरोप झाले असे विचारण्यात आले असता आदित्य ठाकरे म्हणाले की, त्याच्याकडे दुर्लक्ष करणे जास्त योग्य असल्याचा मी विचार केला. कामावर संपूर्ण लक्ष असल्याने तिकडे लक्ष गेले नाही. महाविकास आघाडी चांगल काम करत असून कोणीही त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाहीत ही आमच्यासाठी दिलासा देणारी बाब आहे. यामुळे चुकीचे आरोप आणि वैयक्तिक हल्ले झाले. पण पाच वर्ष आम्ही काम करु, राजकारण नाही.जिथपर्यंत माझ्यावर वैयक्तिक हल्ला होण्याची गोष्ट आहे. तुम्ही फुटबॉल पाहिले असेल तिथे मेस्सी किंवा रोनाल्डो यांच्यासाठी मॅन टू मॅन मार्किंग केली जाते.
त्यांनी गोल करु नये यासाठी घेरण्यात आलेले असते. कदातिच त्यांना माझ्यापासून भीती वाटत असेल.आदित्य ठाकरे यांना यावेळी बॉलिवूडपासून ते मुंबई पोलिसांपर्यंत झालेले वाद तसेच त्यात नाव आल्यासंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले की, जोपर्यंत आपले सरकार होते तोपर्यंत सर्व काही व्यवस्थित होते असे विरोधकांना वाटत आहे. विमान भरुन दिल्लीला कार्यक्रमात जात असत. त्यांच्यासाठी गाणी गात होते. त्यांच्याशी चांगले संबंधही होते. पण जेव्हापासून सरकार गेले तेव्हापासून त्यांना ते वाईट वाटू लागले आहे. बॉलिवूड, मुंबईचे लोक वाईट वाटू लागले. मुंबईला ड्रग्ज सेंटर म्हणण्यात आले. सरकार बदलल्याने त्यांच्या चश्म्याचा नंबरही बदलला असावा. त्याच्या पोटात दुखत आहे. मुंबई, महाराष्ट्रात होणाऱ्या चांगल्या गोष्टींमुळे वाईट वाटत असून आरोप करत सुटले आहेत.असे आदित्य ठाकरे म्हणाले.

No comments
Post a Comment