उर्मिला मातोंडकरच्या शिवसेना प्रवेशावरुन भाजपा खासदार प्रितम मुंडेंचा टोला
मुंबई -
उर्मिला मातोंडकरच्या शिवेसना प्रवेशावरुन भाजपा खासदार प्रितम मुंडे यांनी टोला लगावला आहे. बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करत आपल्या राजकीय कारकिर्दीची नव्याने सुरुवात करणार आहेत. उर्मिला मातोंडकरांच्या प्रवेशाने शिवसेनेचे नशीब बदलणार असेल तर शुभेच्छा असे त्या म्हणाल्या आहे. माझ्याकडून त्यांना शुभेच्छा आहेत. लोकसभेला काँग्रेस पक्षाकडून त्यांनी नशीब आजमावून पाहिले.शिवसेनेत गेल्यानंतर त्यांचे आणि शिवसेनेचे नशीब बदलणार असेल तर दोघांनाही माझ्या शुभेच्छा आहे. असा टोला प्रीतम मुंडे यांनी लगावला. कोणत्याच पातळीवर सरकार चांगले काम करताना दिसत नाही.
त्यांची वर्षपूर्ती ही जनतेच्या निराशेची वर्षपूर्ती आहे असे म्हटले तर चुकीच ठरणार नाही. लवकरच आपल्या कर्माने जिथून आलेत तिथे परत जातील. महाराष्ट्रात चांगले दिवस परत यायचे असतील तर लवकरच भाजपा पुन्हा सत्तास्थानी आलेली दिसेल असा विश्वास प्रीतम मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.उर्मिला मातोंडकर यांनी २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. व त्यांना भाजपाच्या गोपाळ शेट्टींकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. निवडणुकीनंतर त्यांनी आपल्या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामाही दिला होता. राजकारणातून दूर राहिल्यानंतर वर्षभरानंतर त्या पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार आहे.

No comments
Post a Comment